बाळ जन्माला घालण्यापूर्वीच सात माता कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:24+5:302021-05-21T04:14:24+5:30

परतवाडा : या लॉकडाऊनमध्ये बाळ जन्माला घालण्यापूर्वीच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सात माता कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. त्यांना तात्काळ अमरावती ...

Seven mothers corona positive before the baby is born | बाळ जन्माला घालण्यापूर्वीच सात माता कोरोना पॉझिटिव्ह

बाळ जन्माला घालण्यापूर्वीच सात माता कोरोना पॉझिटिव्ह

Next

परतवाडा : या लॉकडाऊनमध्ये बाळ जन्माला घालण्यापूर्वीच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सात माता कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. त्यांना तात्काळ अमरावती येथे पाठविण्यात आले असून आता त्या माता आणि त्यांचे बाळ सुखरूप आहेत.

या लॉकडाउनमध्ये १९ दिवसांत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात ११९ मातांनी बाळांना जन्म दिला. यात ६४ मातांची प्रसूती नॉर्मल, तर ५५ मातांची प्रसूती सिझेरियनद्वारा झाली. कोरोनाच्या अनुषंगाने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची दररोज कोरोना चाचणी केली जात आहे. यात कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाला वेगळे ठेवले जात आहे. गरोदर माता कोरोना संक्रमित निघाल्यास त्यांना अमरावतीला पाठविले जात आहे. अचलपूर तालुक्यात १९ दिवसांत ६० हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. यात अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील २७ मुलांचा समावेश आहे. उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. लहान मुले कोरोना बाधित होत असताना अशा मुलांवर औषधोपचार करण्याकरिता तालुक्यात कुठेही स्वतंत्र व्यवस्था नाही. दरम्यान लक्षणे नसलेल्या पण, कोरोना संक्रमित असलेल्या या मुलांवर खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला जात आहे. मात्र, पालकांना यात अनेक अडचणी येत आहेत.

धूळ खात आहेत बेड

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांकरिता २० बेडची अद्ययावत व्यवस्था दीड वर्षांपासून धूळ खात आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन बेड आहेत. आयसीयूप्रमाणे ते सज्ज आहेत. सेंट्रलाइज ऑक्सिजन त्या बेडपर्यंत पोहोचविण्यात आले. परंतु अजूनही हा विभाग आरोग्य विभागाकडून सुरू केल्या गेलेला नाही. लहान मुलांना होत असलेला कोरोना बघता हे बेड उपयुक्त ठरू शकतात.

कोट

लॉकडाऊनमध्ये मे महिन्यातील १९ दिवसांत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सात माता, बाळ जन्माला घालण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यात. ११९ मातांनी बाळांना सुखरूप जन्म दिला आहे.

- डॉ. सुरेंद्र ढोले, वैदयकीय अधीक्षक

उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Seven mothers corona positive before the baby is born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.