रेतीचे सात ओव्हरलोड ट्रक, ट्रेलर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:12+5:302020-12-11T04:30:12+5:30
पान २ चे लिड वरूड : क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणारे सात ट्रक, ट्रेलर पांढुर्णा चौकात पकडण्यात आले. परीविक्षाधिन ...
पान २ चे लिड
वरूड : क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणारे सात ट्रक, ट्रेलर पांढुर्णा चौकात पकडण्यात आले. परीविक्षाधिन आयपीएस तथा ठाणेदार श्रेणीक लोढा यांनी सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई केली.
यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी अवैध ओव्हरलोड रेती तस्करीला चाप लावण्यासाठी धाडसत्र राबवून ठाणेदार लोढा यांनी तब्बल ३५ डंपर जप्त केले होते. या ३५ डंपरवर महसूल विभागाने १ कोटी ५ लक्ष रुपये दंड ठोठावला. ३५ ट्रक अद्याप महसूल विभागाच्या ताब्यात असताना रेती तस्करी थांबलेली नाही. मध्यप्रदेशातून पुन्हा रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच ठाणेदारांनी गस्त वाढविली. ते स्वत: रस्त्यावर उतरले. १८ चाकी ट्रेलर आणि १२ चाकी ट्रकदवारे ओव्हरलोड रेतीची वाहतूक करताना सात ट्रक, ट्रेलर जप्त करण्यात आले. यामध्ये एमएच २७ बीएक्स ३२७२ , एमएच ३४ एव्ही ३१४७ , आरजे ११ जीबी ३०४९ आरजे ११ जीबी २३३७ , आरजे ११ जीबी १०६८ , जीजे १२बीटी ९५५२ , एमपी ०७ एचबी ६४३१ या क्रमांकाच्या वाहनांचा समावेश आहे. सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत, पोलीस कर्मचारी असलम, सागर, पंकज, प्रशांत, कमलेश यांच्यासह वरूड पोलिसांनी ही कामगिरी केली.
अलीकडच्या काळात जिल्ह्यात रेती वाहून नेणाऱ्या ६१ ओव्हरलोड डंपरवर कारवाई करण्यात आली. त्यात वरूड येथील ४२ , तिवसा १४ धामणगाव ३ आणि शिरखेड येथील दोन कारवायांचा समावेश आहे.
आरटीओची कारवाई केव्हा?
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेतीची बेसुमार ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. परिवहन आणि खनिकर्म विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अव्याहतपणे रेती तस्करी सुरू असताना, आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यावर बºयापैकी अंकुश मिळविला आहे. मात्र, ज्यांची सर्वप्रथम जबाबदारी आहे, त्या महसूल व आरटीओ विभागाकडून कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी रेती तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. ३५ डंपरवर १ कोटी ५ लक्ष रुपये दंड महसूल विभागाने थोटावला. मात्र, आरटीओने अद्यापही याप्रकरणात कुठलीही कारवाई केली नाही.
महसूलकडून दंड लावण्यात धन्यता
पोलिसांच्या तुलनेत रेती तस्करी, वाहतूक व उत्खननावर नियंत्रण व कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी ही महसूल विभागाची आहे. त्यासाठी तहसीलस्तरावर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांची पथके गठित करण्यात आली आहेत. तलाठ्यांवर गावस्तरावरील रेतीघाट, नदीनाल्यांमधून रेतीची चोरी होऊ न देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. मात्र, महसूलच्या तुलनेत पोलिसांकडून कारवाईची लगबग केली जाते. पोलीस विभागाकङून त्यांनी केलेल्या कारवाईचे पत्र मिळाल्यानंतर केवळ दंड लावण्यात महसूल विभाग धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
-------------------