सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:53 PM2022-09-14T16:53:21+5:302022-09-14T16:57:45+5:30

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे.

Seven people died, 33 thousand hectares affected; Heavy damage in West Vidarbha due to rain in 48 hours | सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

Next

गजानन मोहोड

अमरावती - विभागात दोन दिवस झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये १५ गुरे दगावली. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे ३२,७८५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण सुरु असून बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.    

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय ११ घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

या आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात चार, बुलडाणा जिल्ह्यात पाच व वाशिम जिल्ह्यात एक असे एकूण लहान-मोठ्या १६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. विभागात सध्याही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. याशिवाय शेतात पाणी व रस्त्यांमध्ये चिखल असल्याने पिकांच्या पंचनाम्यात अडथडे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाशिम जिल्ह्यात १७,०८४ हेक्टरमधील तुर, सोयाबीन व कपाशी तसेच संत्रा पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ३३४, अकोला २५ व यवतमाळ जिल्ह्यात चार असे एकूण ३६३ घरांची पडझड झालेली आहे.
 

Web Title: Seven people died, 33 thousand hectares affected; Heavy damage in West Vidarbha due to rain in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.