साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:45 PM2018-05-20T22:45:33+5:302018-05-20T22:45:33+5:30

गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़

Seven thousand farmers are deprived of electricity connections | साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

Next
ठळक मुद्देवर्षभर यादी प्रलंबित : शेतकऱ्यांना आधाराची गरज

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़
विदर्भात सर्वाधिक कमी पावसाची नोंद गतवर्षी अमरावती जिल्ह्यात झाली़ शेतकºयांनी अल्प पावसात आपल्या शेतातून खरिपाचे उत्पन्न घेतले. मात्र रबी हंगामात विहिरीला काहीअंशी पाणी असताना कृषिपंपाची वीज नसल्याने कोणतेही उत्पन्न घेता येत नाही़ यंदा जिल्ह्यात विंधन, सिंचन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र वीज जोडण्या मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
एचव्हीडीएस लाभ मिळणार कधी?
पैसे भरून प्रलंबित कृषिपंप ग्राहकांना आता उच्च वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती़ सध्याच्या पध्दतीनुसार शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषिग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी होते़ वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ किमान दोन ते तीन शेतकºयांना एक रोहीत्र देण्यात येऊन एचव्हीडीएस या नव्या प्रणालीद्वारे कधी वीज देण्यात येणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे़
१३ तालुके उपेक्षित
गत एक वर्षापासून सर्वाधिक अचलपूर तालुक्यातील ९५५ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे़नांदगाव खंडेश्वर ९४२, धामणगाव रेल्वे ७८०, दर्यापूर ७५०, अंजनगाव सुर्जी ७१४, मोर्शी ५९७, चांदूर रेल्वे ४५९, अमरावती ५५२, भातकुली २८८, तिवसा ४६४, चांदूर बाजार ५३५, वरूड ४३५, धारणी १०५, चिखलदरा ६५ या तालुक्यातील शेतकºयांची संख्या दररोज विज मंडळाच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी चकरा मारत आहे़

शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी विहीर खोदली. मात्र, कृषिपंपाना वीजपुरवठा मिळत नसल्याने कोणताच लाभ होत नाही़ शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे़
- अशोक क्षीरसागर, शेतकरी, जळगाव

Web Title: Seven thousand farmers are deprived of electricity connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.