विद्यापीठात सात हजार विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:26+5:302021-05-21T04:14:26+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षेला गुरुवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी विनाअडथळ्यांनी ऑनलाईन परीक्षेत सात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षेला गुरुवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी विनाअडथळ्यांनी ऑनलाईन परीक्षेत सात हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. महाविद्यालयाने गुगल फाॅर्मद्धारे परीक्षेच्या तासभरापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठविल्या होत्या.
सकाळी १० ते ११, दुपारी १२ ते १ आणि ३ ते ४ अशा तीन टप्प्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी २७ पेपरचे नियोजन करण्यात आले असून, सात हजार विद्यार्थी परीक्षेला सामाेरे गेले. आता २२ मे रोजी ऑनलाईन परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. परंतु, २१ मेपासून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार एम. ए. विषयाच्या परीक्षा संचारबंदीमुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळांचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या स्थिती लक्षात घेत संचारबंदीच्या आदेशानुसार एम.ए.च्या स्थगित परीक्षांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे संकेत परीक्षा विभागाने दिले आहे. २० मेपासून सुरू झालेल्या ऑनलाईन परीक्षा ४ जूनपर्यंत चालणार आहेत.