भूमिगत नाली चोकअप झाल्याने नागरिकांच्या घरात सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:54+5:302021-07-02T04:09:54+5:30
पान अटाई ते शनिवारा पेठ या भागातील खुल्या असलेल्या नाल्या काही महिन्यांपूर्वी नगर पालिकेच्यावतीने नव्याने तयार करून त्या भूमिगत ...
पान अटाई ते शनिवारा पेठ या भागातील खुल्या असलेल्या नाल्या काही महिन्यांपूर्वी नगर पालिकेच्यावतीने नव्याने तयार करून त्या भूमिगत करण्यात आल्या. सोमवारी आलेल्या तासभराच्या संततधार पावसाने कचरा अडकून नाली ब्लॉक झाली व पाण्याला बाहेर निघण्याला वाट नसल्याने घाण व दुर्गंधीयुक्त पाणी घरातील पाईपमधून थेट पान अटाई स्थित रहिवासी दिलीप ईताल यांच्या घरात घुसले. काही वेळातच घरात पाणीच पाणी झाले. त्यांच्या घरी मुलाचे लग्न असल्याने साहित्य केले होते. त्याचे पाण्याने नुकसान झाले. नालीवरील काँक्रीट फुटल्याने दुसऱ्या दिवशी काही भागात रस्त्याने वाहत असल्याचे निदर्शनास आले. भूमिगत गटार तयार करताना त्यात कचरा अडकून त्या ब्लॉक होणार नाहीत, याबाबत उपाय करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
----------------
आजपर्यंत नालीतील पाणी घरात येण्याचा प्रकार कधीच घडला नव्हता. नाली बांधकामानंतर पहिल्याच पावसात मुलाच्या लग्नासाठी आणलेले महागडे कपडे व इतर साहित्याचे नुकसान झाले. नगरपालिकेने उपाययोजना करावी.
- दिलीप ईताल, अंजनगाव सुर्जी