चिचखेडा येथील घरातून सागवान लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:53 PM2018-10-09T21:53:17+5:302018-10-09T21:53:44+5:30

पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील चिचखेडा येथे वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री टाकलेल्या धाडीत एका घरात सागवान लाकूड जप्त करण्यात आले. वनतस्कराला अटक केली असून, त्याला अचलपूर न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

Sewan wood seized from home at Chinchkheda | चिचखेडा येथील घरातून सागवान लाकूड जप्त

चिचखेडा येथील घरातून सागवान लाकूड जप्त

Next
ठळक मुद्देवनविभागाची धाड : आरोपीला वनकोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील चिचखेडा येथे वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री टाकलेल्या धाडीत एका घरात सागवान लाकूड जप्त करण्यात आले. वनतस्कराला अटक केली असून, त्याला अचलपूर न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
रवि किसन कोगे (४५, रा. चिचखेडा) असेच तस्कराचे नाव असून, गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री त्याच्या घराची झडती घेतली. अवैधरीत्या आणलेले सागवान आढळून आले. सागवानचे तब्बल ५५ सरपट आढळले. ०.६१५ घनमीटर या लाकडाची किंमत २८ हजार रुपये आखण्यात आली आहे, तर घरातून १० हजार रुपये किमतीची सुतारकामासाठी वापरलेली अवजारे आढळली. तीसुद्धा वनविभागाच्या पथकाने जप्त केली. सागवान तस्कर रवि कोगेविरुद्ध वन अधिनियमचे कलम ३१ (१) ४७ व ५३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड यांच्या नेतृत्वात वनपाल विजय बारब्दे, वनरक्षक प्रदीप जैन, प्रतीक चावरे, संदीप चौधरी आदींनी केली.
तस्कराला वनकोठडी
सागवान तस्कर रवि कोगे याला न्यायालयात हजर केले असता १० आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. परतवाडा अंजनगाव व अकोट परिसरात हा सागवान माल मोठ्या तस्करांकडे मध्यरात्री ३ नंतर जंगलातील आडमार्गाने पोहोचवला जात असल्याची माहिती सर्वश्रुत आहे.

Web Title: Sewan wood seized from home at Chinchkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.