चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:17 PM2018-08-17T22:17:17+5:302018-08-17T22:17:34+5:30
चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अल्पवयीन मुलास नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले असून, त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अल्पवयीन मुलास नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले असून, त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना चाकूचा धाक दाखवून जबरीने लैंगिक अत्याचार केले आणि जिवे मारण्याची धमक्या दिली. ती मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असताना, तिचे कुटुंबीय मुलाच्या घरी गेले. त्यांना हाकलून लावण्यात आले. त्यानंतरही मुलीशी लग्न करण्याचे सांगून पीडितावर मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केले.
आता पीडित सात महिन्याची गर्भवती असून, तिच्या कुटुंबीयांनी गुरुवारी नागपुरी गेट पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(२), ४१७, ५०४, ५०६, सहकलम ४ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात प्राथमिक तपास नागपुरी गेट ठाण्यातील एएसआय संजय बाळापुरे यांनी केला.