विवाहित प्रियकराचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 11:09 PM2018-09-02T23:09:02+5:302018-09-02T23:09:24+5:30

प्रेमप्रकरणानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यानंतरही प्रेयसीशी लैंगिक संबध ठेवल्याने ती आठ महिन्यांची गर्भवती झाली, ही बाब प्रियकराला सांगण्यास गेलेल्या महिलेला मारहाण करून घरातून हाकलून लावले. ही धक्कादायक घटना रविवारी फे्रजरपुरा हद्दीत उघडकीस आली.

Sexual harassment on a married lover's beloved | विवाहित प्रियकराचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

विवाहित प्रियकराचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देफे्रजरपुरा हद्दीतील घटना : पीडित आठ महिन्यांची गर्भवती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रेमप्रकरणानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यानंतरही प्रेयसीशी लैंगिक संबध ठेवल्याने ती आठ महिन्यांची गर्भवती झाली, ही बाब प्रियकराला सांगण्यास गेलेल्या महिलेला मारहाण करून घरातून हाकलून लावले. ही धक्कादायक घटना रविवारी फे्रजरपुरा हद्दीत उघडकीस आली.
पीडिताच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी प्रवीण भाऊराव चंडकापुरे व त्याच्या भाऊ असे दोघांना आरोपी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी २८ वर्षीय महिला फे्रजरपुरा हद्दीत भाड्याने राहत होती. तिचा परिचय प्रवीण चंडकापुरे (रा.किशोरनगर) याच्याशी झाला. दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू झाले. प्रवीण पीडिताच्या खोलीवर येऊन शारीरिक संबध प्रस्थापित करायला लागला. दरम्यानच दोन वर्षांपूर्वी प्रवीणने दुसºया मुलीशी लग्न केले. मात्र, फेब्रुवारी २०१८ मध्ये पीडित महिलेली आपण गर्भवती असल्याचे समजले. तिने प्रवीणची भेट घेऊन त्याला गर्भधारणेविषयी सांगितले. त्याने गर्भपात करू नको, मी लग्न करेन, असाच सल्ला पीडिताला दिला. पीडितेने १ सप्टेंबर रोजी प्रवीणला फोन केला. त्याने उचलला नाही. अखेर तिने प्रवीणचे घर गाठले. त्यावेळी प्रविणने पिडीतेला मारहाण करून शिवीगाळ व धमक्या देत घरातून हाकलून लावले. या घटनेची तक्रार पीडिताने रविवारी फे्रजरपुरा पोलिसात केली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(२)(एन), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.

Web Title: Sexual harassment on a married lover's beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.