मद्यात गुंगीचे औषध टाकून तरूणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:29 PM2017-09-17T22:29:19+5:302017-09-17T22:29:58+5:30

पालन पोषणासह लग्न लावून देण्याचे आमीष दाखवून तरूणीला मद्यातून गुंगीचे औषध देण्यात आले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला.

Sexual harassment on the young woman by putting a stingy drug in medicine | मद्यात गुंगीचे औषध टाकून तरूणीवर लैंगिक अत्याचार

मद्यात गुंगीचे औषध टाकून तरूणीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देदाम्पत्याविरुद्ध गुन्हा : नरहरीनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पालन पोषणासह लग्न लावून देण्याचे आमीष दाखवून तरूणीला मद्यातून गुंगीचे औषध देण्यात आले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना नरहरीनगरात घडली असून याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा नितीन हिरूळकर व त्याच्या पत्नीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
नरहरीनगरातील रहिवासी नितीन हिरूळकर व पीडितेचे वडिल मित्र होते. पीडितेच्या वडिलांनीन त्यांच्या संपत्ती विक्रीसंबंधी व्यवहारात नितीन हिरूळकरने मध्यस्थाची भूमिका निभावली. काही कालावधीनंतर पीडितेच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे नितीन हिरूळकर याने मित्राच्या एका मुलीला त्याच्याच घराच्या आवारात राहण्यास खोली दिली. विवाहासह तिच्या पालन पोषणाची जबाबदारीही स्वीकारली. आरोपी हिरूळकर पीडित मुलीकडून घरातील कामे करून घेत असे आणि तिच्याशी अश्लील चाळे करीत असे. पीडित मुलीला अश्लील चित्रफिती दाखवून तिला मद्यातून गुंगीचे औषध देणे, ती नशेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, असा प्रकार सुरू होता. नितीनच्या अशा अश्लील कृत्यात त्याच्या पत्नीचे सहकार्य केल्याचे व हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. न्यायासाठी पीडितेने अनेकदा पोलिसांचे उंबरठे झिजविले. मात्र, या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष चालविण्यात आले होते. दरम्यान पीडितेने तिच्या आईसह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे दार ठोठावले. त्यांच्या निर्देशानुसार राजापेठ पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपी नितीन हिरूळकर व त्याच्या पत्नीविरूद्ध भादंविच्या कलम ३७६ (२),(एन), २९२, १०९, ३५४(अ), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कान्होपात्रा बन्सा करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Sexual harassment on the young woman by putting a stingy drug in medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.