शहीद भगतसिंग बालोद्यान ४८ वर्षांनंतरही महापालिकेकडून दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:20+5:302021-03-22T04:12:20+5:30
अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती, को-ऑपरेटिव्ह कॉलनीचे तत्कालीन अध्यक्ष स्व. ॲड श्रीमाळी, प्रा, देवराब बिजवे, राजेंद्रप्रसाद मिश्रा यासह अनेक ...
अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती, को-ऑपरेटिव्ह कॉलनीचे तत्कालीन अध्यक्ष स्व. ॲड श्रीमाळी, प्रा, देवराब बिजवे, राजेंद्रप्रसाद मिश्रा यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. ४८ वर्षांपूर्वी शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद भगतसिंग यांचे धाकटे बंधू सरदार कुलबिरसिंग यांना अमरावती नगरपालिकेने निमंत्रित केले होते व याच दिवशी इर्विन चौकातील शहीद स्मृतीस्तंभाचादेखील शिलान्यास याच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. या घटनेला आता ४८ वर्षे पूर्ण होत असताना महापालिकेला कुठलेच भान नाही.
या ऐतिहासिक बालोद्यानाच्या जागेवर आता फुटबॉलचे मैदान आहे. सायंकाळी मुल-मुली येथे खेळतात. माजी आमदार रावसाहेब शेखावत व नगरसेवक दिनेश बुब यांनी काही निधी देऊन येथे कपाऊंडवॉल, सकाळी फिरण्यासठी ट्रॅक तयार केल्याचे याच परिसरातील आनंद मिश्रा यांनी सांगितले. मात्र, येथे आता सेंट्रींगचे सामान, लाकडे पडली आहे. ४८ वर्षांनंतर का होईना, या शहीददिनी महापालिकेला या ऐतिहासिक घटनेची जाग यावी व बालोद्यानाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा राजश्री कॉलनीतील प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
बॉक्स
मैदानात वाहने, लाकडे, म्हसी
या मैदानात फिरण्याच्या ट्रॅकवर झाडे तोडून ठेवली आहेत. एका व्यक्तीने येथे सेंट्रींगचे साहित्य ठेवले आहे. येथे कधी म्हशीदेखील बांधण्यात येतात. लोखंडी जाळीचे कंपाऊडदेखील काही ठिकाणी तोडण्यात आलेले आहे. बांधण्यालेल्या खोलीचीदेखील दुरवस्था झालेली आहे. महापालिकेचा कुणीही अधिकारी येथे फिरकला नाही, त्यामुळे या प्रकारात वाढ होत आहे.
कोट
००००००००
०००००००००००
चेतन गावंडे (महापौर)