शंकरबाबांना डी.लिट अन् संशोधनात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:00 AM2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:55+5:30
अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे, डॉ. संजय डुडूल, डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या नावे पेटेंट नोंदविण्यात आल्याने निश्चितच विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळेत गेले नाही. मात्र समाजप्रबोधनातून अहोरात्र जागृती त्यांनी केली. म्हणून त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठ स्थापन झाले. हे जगातील आगळेवेगळे उदाहरण ठरणारे आहे. दरवर्षी या विद्यापीठातून लाखो विद्यार्थी पदवी घेतात. परंतु, यंदा अनाथाचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. उपाधी बहाल करण्यात आली. तसेच विद्यापीठातील नऊ जणांनी पेटेंंट मिळविले. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेची नोंद करण्यात आली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर पहिल्यांदाच अचलपूरनजीकच्या वझ्झर येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहाचे सर्वेसर्वा अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना अमरावती विद्यापीठाने डी.लिट. उपाधीने सन्मानित केले.
अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे, डॉ. संजय डुडूल, डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या नावे पेटेंट नोंदविण्यात आल्याने निश्चितच विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे. यंदा कार्यकाळ संपल्याने प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील, डॉ. एफ.सी. रघुवंशी यांना पदमुक्त व्हावे लागले.
डिझॉस्टर मॅनेजमेंट सेल स्थापना, नवीन बंधाऱ्यांची निर्मिती, सौर ऊर्जेसाठी ऊर्जा संवर्धन पुरस्कार विद्यापीठाने पटकावला आहे. व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामित सदस्य डॉ. दिनेश सूर्यवंशी यांना पदमुक्त करण्यात आले. यंदा डॉ. दिलीप मालखेडे यांच्या रूपाने अमरावती विद्यापीठाला भूमिपूत्र कुलगुरू मिळाले आहे.
परीक्षा विभागात आमूलाग्र बदल
अमरावती विद्यापीठाने परीक्षा विभागात आमूलाग्र बदल केले आहे. कोरोना संसर्गाची भीती असतानासुद्धा ऑनलाईन परीक्षा, निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पीएचडी पेट ऑनलाईन नोंदणी, संशोधन केंद्र, परीक्षा आवेदन पत्र ऑनलाईन, नामांकन, महाविद्यालयात प्रवेश, परीक्षा अर्ज आदी बाबीदेखील ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.