शंकर महाराजांसह १५ जणांवर फौजदारी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:11 AM2018-05-05T05:11:44+5:302018-05-05T05:11:44+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री संत शंकर महाराज यांच्यासह आश्रम ट्रस्टच्या एकूण १५ पदाधिकाऱ्यांविरुद्ध धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून घेत फौजदारी खटला आरंभला आहे.
- गणेश देशमुख
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री संत शंकर महाराज यांच्यासह आश्रम ट्रस्टच्या एकूण १५ पदाधिकाऱ्यांविरुद्ध धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून घेत फौजदारी खटला आरंभला आहे. प्रथम श्रेणी न्यायाधीश विवेक डी. देशमुख यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण
निकाल दिला. जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत न्यायालयाने स्वत:हून गुन्हे नोंदवून घेणे व फौजदारी खटला भरण्याचा हा देशभरातील पहिलाच निर्णय आहे.
शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणेचा गळा कापून
आणि अजय वणवे याचा चेहरा ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे दोन्ही चिमुकले आश्रम ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाºया निवासी शाळेचे विद्यार्थी होते. ह्यलोकमतह्णच्या शोधपत्रकारितेमुळे या दोन्ही प्रकरणांचा भांडाफोड झाला होता.
आश्रमात मोठी माया जमविलेल्या शंकर महाराज यांनी स्वानुभवाच्या आधारावर ह्यअनुभव ब्रह्मह्ण हे पुस्तक लिहिले. लघवी करून दगडाचे सोने करणे, वाट्टेल त्या व्यक्तिला वश करणे, इतरांच्या मनातील गुपिते ओळखणे, अष्टसिद्धी प्राप्त करणे अशा अनेक अंधश्रद्धा पसरविणाºया बाबी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत. आश्रमातील नरबळीचा प्रयत्न उघडकीस आणल्यानंतर ह्यलोकमतह्णने शंकर महाराजांच्या त्या पुस्तकातील अंधश्रद्ध लिखाणावर वृत्तमालिकेतून सवाल उपस्थित केले होते.
‘लोकमत’च्या वृत्तांची दखल घेऊन अमरावतीचे वकील संजय वानखेडे यांनी ह्यअनुभव ब्रह्मह्ण पुस्तकाच्या लिखाणासाठी शंकर महाराज आणि ट्रस्टच्या पदाधिकाºयांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवून अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना द्यावेत, अशी मागणी करणारी फिर्याद धामणगाव (जि.अमरावती) प्रथमश्रेणी न्यायालयात दिली होती. नरबळीचे प्रयत्न शंकर महाराज यांच्या आदेशानेच घडले, असेही वानखेडे यांचे म्हणणे होते.
हे आहेत आरोपी
श्री संत शंकर महाराज बुधाजी नागपुरे (अध्यक्ष, पिंपळखुटा आश्रम), नंदुसेठ बंडुजी चव्हाण (उपाध्यक्ष, धायरी, पुणे), राजेंद्र देवीदासजी लुंगे (सचिव, वर्धा), भाष्करराव रंगरावजी मोहोड (सहसचिव, अमरावती), देवेंद्र पंडितराव वºहेकर (खजिनदार, नºहे, पुणे), सुदाम बुधाजी नागपुरे (विश्वस्त, पिंपळखुटा, महाराजांचा भाऊ), बाळासाहेब ज्योतिबा दांगट (विश्वस्त, नºहे, पुणे), सुधाकर दुधारामजी बांते (विश्वस्त, अयोध्यानगर, नागपूर), शरदराव श्रीरामजी इंगळे (विश्वस्त, किर्ती कॉलनी, अमरावती), राजेश बबनराव मिंदे (विश्वस्त, धायरी, पुणे), रामदास पोपटराव दांगट (विश्वस्त, नºहे, पुणे), प्रशांत पुरुषोत्तम शेलोकार (विश्वस्त, मनीषनगर, नागपूर), संतोष वसंतराव पोकळे (विश्वस्त, यावलेवाडी, पुणे), शिरीष चंद्रकांत चौधरी (विश्वस्त, प्रसादनगर, नागपूर), नितीन वासुदेवराव राऊत (विश्वस्त, शास्त्रीनगर, अकोला).
सात साक्षीदार
जादुटोणाविरोधी कायद्याचे लेखण करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी याप्रकरणी धामणगाव रेल्वे न्यायालयात साक्ष नोंदविली. समितीचे राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे यांनी नरबळीप्रकरणी सत्यशोधन अहवाल न्यायालयात सादर केला. साक्ष दिली. अजयची आई किरण वनवे, प्रथमेच्या बहिण प्रतीभा बापुराव राऊत तसेच नरबळीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी सुरेंद्रचे वडील रमेश मराठे, शंकर महाराजांचे जुने साथीदार सहदेव किडले यांच्या साक्षीही नोंदविण्यात आल्यात.
न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. धर्मसत्तेच्या दबावाला न जुमानता देण्यात आलेला हा निकाल लोकरक्षणाचा नवा पायंडा रुजवेल. - श्याम मानव, सहयोगी अध्यक्ष,
जादुटोणा विरोधी कायदा प्रचार, प्रसार समिती, महाराष्टÑ शासन.