शंकरबाबांची मूकबधिर लक्ष्मी झाली मध्यप्रदेशची स्नुषा

By admin | Published: March 22, 2017 12:08 AM2017-03-22T00:08:07+5:302017-03-22T00:08:07+5:30

पाहुण्यांची वर्दळ... सनई-चौघड्यांचे पवित्र स्वर.. अशा मंगलमय वातावरणात शंकरबाबांची १८ वी मानसकन्या मूकबधिर लक्ष्मी रिती-रिवाजानुसार मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याची सून झाली.

Shankarabababa's Mokbadhar Lakshmi took care of Madhya Pradesh | शंकरबाबांची मूकबधिर लक्ष्मी झाली मध्यप्रदेशची स्नुषा

शंकरबाबांची मूकबधिर लक्ष्मी झाली मध्यप्रदेशची स्नुषा

Next

१८ व्या कन्येचे दान : वझ्झरमध्ये आनंदोत्सव, बैतुल येथील सामूहिक विवाह सोहळ्यात बांधल्या गाठी
परतवाडा : पाहुण्यांची वर्दळ... सनई-चौघड्यांचे पवित्र स्वर.. अशा मंगलमय वातावरणात शंकरबाबांची १८ वी मानसकन्या मूकबधिर लक्ष्मी रिती-रिवाजानुसार मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याची सून झाली. लक्ष्मीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वझ्झरच्या बालगृहात आनंदोत्सव साजरा झाला. हा विवाह सोहळा मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात पार पडला अन् शंकरबाबांसह लक्ष्मीच्या भावंडांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
देशभरातील बेवारस, अनाथ, अपंग, मतिमंद मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारलेले वझ्झर येथील बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकरांची लक्ष्मी ही १८ वी मानसकन्या. याच बालगृहात ती लहानाची मोठी झाली. वयानुरूप तिचा विवाह मध्यप्रदशातील भैसदेही तालुक्यातील आमपाटी येथील बाबूलाल अडलक यांच्या मूकबधिर सत्यप्रकाश नामक मुलासोबत निश्चित झाला आणि ठरलेल्या तारखेवर थाटात पारही पडला.
बैतुल येथे रविवारी २८० दिव्यांग युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हेते. देशातील १४० दिव्यांग जोडप्यांचा हा सामूहिक विवाह सोहळा होता. यामध्ये मूकबधिर लक्ष्मी आणि सत्यप्रकाशची जोडी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. निराधार लक्ष्मीचे शिक्षण पाढर येथील आश्रमशाळेत झाले. तेथील अधीक्षिका कैथवास यांनी लक्ष्मीला स्वत:च्या मुलीप्रमाणे वाढविले.

नवदाम्पत्याला मान्यवरांचे आशीर्वाद
बैतुल येथे पार पडलेल्या १४० जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला शंकरबाबा पापळकरांसह अधीक्षिका कैथवास, अकोटकर यांच्यासह बैतुलचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा, अपर जिल्हाधिकारी मूलचंद वर्मा, भैसदेहीचे नगराध्यक्ष अनिल ठाकूर यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक राकेश जैन, आ. हेमंत खंडेलवाल, मंगलसिंह धुर्वे, अल्केश आर्य यांच्यासह शेकडो मान्यवरांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिलेत.

शंकरबाबांच्या १८ मुलींचे विवाह
शंकरबाबा पापळकर हे १२३ अनाथ, अपंगांचे पिता आहेत. त्यापैकी १८ मुला-मुलींचे विवाह पार पडले आहेत. १७ मुला-मुलींचे विवाह महाराष्ट्रातच करण्यात आले. मात्र, १८ वी कन्या लक्ष्मी मात्र मध्यप्रदेशची सून झाली. लवकरच शंकरबाबांच्या १९ व्या मंगल नामक मुलीचा विवाहसोहळा रावेर येथे पार पडणार आहे. ना. गिरीश महाजन हे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

माझ्या लक्ष्मी नामक १८ व्या मुलीचा विवाह बैतूल येथे पार पडला. लवकरच मंगल नामक १९ व्या मुलीचा विवाह रावेर येथे होणार आहे. माझ्या मुली सुखाने नांदाव्यात एवढीच एक बाप म्हणून माझी अपेक्षा आहे.
- शंकरबाबा पापळकर,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
वझ्झर, अचलपूर

Web Title: Shankarabababa's Mokbadhar Lakshmi took care of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.