अवैध धंद्यांचे बळी ठरले ‘शांतीलाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:44 PM2018-09-04T22:44:54+5:302018-09-04T22:45:15+5:30

जुळ्या शहरातील अवैध धंदे आणि चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा एएसआय शांतीलाल पटेल बळी ठरले. दोन्ही शहरांत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, गांजाची तस्करी व विक्री आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शांतीदूत, स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणारा एएसआय शांतीलाल पटेलचा शहरात राजरोसपणे खून झाला. या घटनेने नागरिकांसह पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण घटनेनंतर हळहळ व्यर्थच.

Shantilal is the victim of illegal tricks | अवैध धंद्यांचे बळी ठरले ‘शांतीलाल’

अवैध धंद्यांचे बळी ठरले ‘शांतीलाल’

Next
ठळक मुद्देराग पीएसआयवर, मारले गेले एएसआय : चोरीच्या घटनांमध्ये वाढ

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुळ्या शहरातील अवैध धंदे आणि चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा एएसआय शांतीलाल पटेल बळी ठरले. दोन्ही शहरांत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, गांजाची तस्करी व विक्री आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शांतीदूत, स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणारा एएसआय शांतीलाल पटेलचा शहरात राजरोसपणे खून झाला. या घटनेने नागरिकांसह पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण घटनेनंतर हळहळ व्यर्थच.
शांतीलालच्या मृतदेहावर शासकीय इतमात अंतिम संस्कार पार पडत असतानाच पोलीस शांतीलालला सलामी देत असतानाच चोरट्यांनी नगरसेविकेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली. ३५ ग्राम वजनाची, अंदाजे एक लाखाची चेन जेव्हा चोरट्यांनी पळविली तेव्हा शहरात लहान मोठ्या पोलीस अधिकाºयांसह पोलीस मोठ्या संख्येने शहरात हजर होते. या चोरीच्या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली असून अचलपूर नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती श्रीमती किरण मालू यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.
घटनेच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक ठाकरे गस्तीवर होत्या. दरम्यान त्यांनी शांतीलालच्या मारेकºयांना हटकले. हटकले म्हणून ते रागावले आणि थोड्या वेळातच त्यांनी त्या पीएसआय मॅडमचा शोध घ्यायला सुरुवात केली. नको ती बडबडही केली. हाती लोखंडी सळाख घेऊन भर रस्त्याने फिरलेत. टपकविण्याची भाषाही ते बोललेत. ही एवढी हिंमत यांच्यात आली कुठून, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागेल. खरेतर शांतीलालचा नाहक बळी गेला. परतवाडा ठाण्यात कार्यरत असताना कुठलीही माहिती विचारा, हसत खेळत शांतीलाल दुसºयाचा क्या भाई शांतीलाल गाव मे शांतता है? हा सब कुछ शांत है, असे बोलणारा शांतीलाल आपल्याच मोहल्ल्यात स्वच्छतादूत म्हणून ओळखले जायचे. स्वच्छतेचा पुजारी म्हणून तो ओळखल्या जायचा. अचलपूरहून परतवाड्याकडे पांढरा सदºयावर येताना शांतीलालला मारेकºयांनी थांबवले. ओढाताणीत त्यांचा सदरा निघाला अन् पोलिसांची वर्दी मारेकरºयांच्या नजरेत भरली. पीएसआयवर राग ठेवून टपकवण्याची भाषा वापरणाºया मारेकºयांचा राग अनावर झाला अन् एएसआय शांतीलालला ठार करूनच तो शांत झाला.

Web Title: Shantilal is the victim of illegal tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.