डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने शरद पवार सन्मानित, नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 27, 2023 09:19 PM2023-12-27T21:19:44+5:302023-12-27T21:19:56+5:30
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेबांच्या नावे पहिला पुरस्कार
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. भाऊसाहेबांच्या नावे दिला जाणारा पहिला ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ देशाचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी खा. नवनीत राणा, आ. सुलभा खोडके, माजी गृहमंत्री तथा आ. अनिल देशमुख, आ. किरण सरनाईक, माजी खासदार अशोकराव मोहोळ, प्रियदर्शन देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, जयवंतराव पाटील यांसह सदस्य हेमंत देशमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाऊसाहेबांच्या प्रयत्नातून एक फार मोठे कार्य विदर्भात उभे झालेले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलल्याचे गडकरी म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्या काळामध्ये जो विचार मांडला तो शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा व विकासाचा आणि याकरिता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भाऊसाहेबांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढल्याचे ना. गडकरी म्हणाले.नी केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सदस्य, संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी व शिव परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------
भाऊसाहेबांच्या नावाने १२५ रुपयांच्या नाण्याचे विमोचन
डाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५व्या जयंतीप्रित्यर्थ भारत सरकारच्या वतीने १२५ रुपयांचे नाणे काढण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमींच्या टाळ्यांच्या कडकडाटात ना. नितीन गडकरी व खासदार शरद पवार यांच्या हस्ते या नाण्यांचे विमोचन करण्यात आले.
---------------------------------
पुरस्कार राशीच्या व्याजातून महिला शेतकऱ्याचा सन्मान
मातोश्री शारदाबाई यांनी शेती करून आम्हा सर्व भावंडांना शिक्षित केले आहे. त्या माऊलीचा आदर्श समाजासमोर राहावा, यासाठी पुरस्काराच्या राशीमध्ये अधिक १५ लाख देणार व यामधून येणाऱ्या व्याजातून महिला शेतकऱ्याचा सन्मान करण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.