सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 07:21 PM2017-11-25T19:21:53+5:302017-11-25T19:24:51+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. यावर भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Sharad Pawar looking after the Chief Minister's guidance to the RSS, asks Nana Patalenka? | सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

googlenewsNext

अमरावती - मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. या एकूणच संशयास्पद प्रकाराबाबत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी येथे 'लोकमत'शी बोलताना केली.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी नाना पटोले हे अमरावतीत आले असताना त्यांनी भाजपाला हा घरचा अहेर दिला.  सरसंघचालक हे सन्मानाचे पद आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून श्रीकांत जिचकारांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी जाहीर वक्तव्य करून सरसंघचालकांचा गौरव केला आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वयंसेवक असतो. ‘परिवार’ ही पक्षाची संकल्पना आहे. अशा व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे. 

अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी शरद पवारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. आता १२ तारखेला पवार कर्जमाफीविरुद्ध मोर्चा काढताहेत. अमरावतीच्या मंचावरच पवारांनी फसव्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना खडे बोल का सुनावले नाहीत? सरकारला कुणी फसविले, असा माझा मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल असल्याचे पटोले म्हणाले. आपण पूर्वीपासूनच ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत आलो आहे. राज्य विचारावर चालायला पाहिजे; येथे तर सगळा संभ्रम आहे. त्यामुळे शेतक-यांच्या फसवणुकीसाठी भागीदारी कुणाची, असा टोला पटोले यांनी शासनाला लगावला.

बॅन असलेली कीटकनाशके राज्यात  कशी ?
देशात ९३ कीटकनाशकांवर बॅन असताना राज्यात ती दाखल होतात कशी, विकली जातात कशी,  असा सवाल खा. पटोलेंनी उपस्थित केला. कीटकनाशकांच्या विषबाधेने ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक बळी गेले आहेत. शासननियुक्त ‘एसआयटी’ हादेखील एक फार्स आहे. विषबाधेची चौकशी करणा-या एसआयटीमध्ये या विषयाचा एकही तज्ज्ञ नाही. मृतांच्या वैद्यकीय परीक्षणात कीटकनाशकांचे अंश आढळत नाहीत. हा कुणाला वाचविण्याचा प्रकार आहे, असा सवाल पटोलेंनी केला.

श्वेतपत्रिका काढा, पारदर्शी कारभार दाखवा!
राज्यात ९६ लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. त्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केले. प्रत्यक्षात चार हजार शेतक-यांनाच याचा लाभ मिळाला. कर्जमाफीसाठीचा पैसा जनतेचाच आहे. त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. हा निधी कर्मचा-यांचा पगार किंवा इतर कामासाठी नाही. त्यामुळे शासनाने या पैशांच्या विनियोगाची श्वेतपत्रिका काढावी व पारदर्शी कारभार दाखवावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

Web Title: Sharad Pawar looking after the Chief Minister's guidance to the RSS, asks Nana Patalenka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.