फेसबुक अकाउंटवरून चाईल्ड पॉर्न कंटेट शेअर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: October 14, 2022 08:20 PM2022-10-14T20:20:16+5:302022-10-14T20:22:16+5:30

१४ नोव्हेंबर २०२० रोजी ते कंटेट शेअर झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Share child porn content from a Facebook account; A case has been registered at the Cyber Police Station | फेसबुक अकाउंटवरून चाईल्ड पॉर्न कंटेट शेअर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुक अकाउंटवरून चाईल्ड पॉर्न कंटेट शेअर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next

अमरावती : फेसबुक अकाउंटवरून बालकांचे दोन अश्लिल व्हिडिओ व सहा छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याने १३ व १४ ऑक्टोबर रोजी फेसबुकवरील दोन अकाउंट धारकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यातील सहायक निरिक्षक रवींद्र सहारे यांनी याबाबत सरकारतर्फे तक्रार नोंदविली.

१४ नोव्हेंबर २०२० रोजी ते कंटेट शेअर झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून अमरावती शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याला कळविले होते. चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी त्या कंटेटचे घटनात्मक विश्लेषण करणाऱ्या जागतिक पातळीवरील एनसीएमए या संस्थेने त्याबाबत देशातील एनसीआरबी (राष्ट्रीय गुन्हे रेकार्ड ब्युरो) ला ती माहिती पाठविली. एनसीआरबीने ती माहिती महाराष्ट्र सायबरला पाठविली. दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२० रोजी एफबीवर बालकांचे दोन अश्लिल व्हिडिओ शेअर करण्यात आले, त्या अकाउंट धारकाचा आयपी ॲड्रेस व लोकेशन अमरावती शहर असे आढळून आले. त्याअनुषंगाने येथील शहर सायबर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले.

Web Title: Share child porn content from a Facebook account; A case has been registered at the Cyber Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.