शशिकांत सातव, एम. एम. मकानदार यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:57+5:302021-09-26T04:14:57+5:30
डीसीपी शशिकांत सातव यांची शहर आयुक्तालयातून ग्रामीण पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली असून एम.एम. मकानदार यांची शहर ...
डीसीपी शशिकांत सातव यांची शहर आयुक्तालयातून ग्रामीण पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली असून एम.एम. मकानदार यांची शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली आहे. शहर पोलीस आयुक्तालयात डीसीपी शशिकांत सातव यांना निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, डीसीपी विक्रम साळी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बॉक्स
कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणार
शहर पोलीस आयुक्तालय नव्याने रुजू झालेले डीसीपी एम.एम. मकानदार यांनी शनिवारी डीसीपी झोन २ चा पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीण पोलीस दलात एएसपी पदाची साडेतीन वर्ष धुरा सांभाळली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर ते भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
एसीपी पुनम पाटील रुजू
अमरावती ग्रामीण पोलीस दलात डीवायएसपी पदाची धुरा सांभाळणाऱ्या पुनम पाटील यांची शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. त्यांनी गाडगेनगर विभागातील सहायक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.