चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Published: June 19, 2015 12:41 AM2015-06-19T00:41:59+5:302015-06-19T00:41:59+5:30

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत.

Shatakoti tree plantation scheme in Chandurbazar taluka | चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

Next

चांदूरबाजार : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत. या वृक्षांना आता जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्यथा लावण्यात आलेली झाडे वाळून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे खर्च व्यर्थ जाणार. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. या योजनेसाठी राज्यात अभियान राबविण्यात आले.
या योजने अंतर्गत प्रत्येक गावात शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयांत अधिकाधिक झाडे लावण्यासाठी जागृती करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला निश्चित उद्दिष्ट्य देण्यात आले. तसेच ध्येयपूर्तीसाठी व झाडे लावण्यासाठी अनुदान दिले गेले. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून झाडे लावणे, झाडांना काटेरी कुंपण लावणे, पाणी टाकणे व देखभालीसाठी अनुदान स्वरुपात खर्च देण्यात आला.
योजना अतिशय चांगली असतानां सुरुवातीलाच या योजनेला तालुक्यात काही मोजक्या गावात प्रतिसाद मिळाला तर ७० ते ८० टक्के ही योजना बोगसरित्या कागदोपत्री राबविण्याचे दाखविले.
शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यात ३० ते ४० टक्के पर्यंत राबविण्यात आलेल्या योजना अंतर्गत लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता माना खाली टाकल्या आहे. या झाडांना जीवनदान मिळण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. पाण्याअभावी लावलेली झाडे वाळू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे ही चांगली मोठी आहेत. मोठी झालेली झाडे भर उन्हाळ्यात आतापर्यंत तग धरुन आहेत. परंतु आता मात्र या झाडांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने व शासनाने याकडे लक्ष देऊन कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा व झाडांना जीवनदान द्यावे, अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करुन शतकोटी योजनेअंतर्गत काही प्रमाणात जिवंत असणारी झाडे मात्र आता दमतोडत असल्याने शासनाच्या कोट्यवधींचा खर्च हा व्यर्थ जाणार, हे निश्चित. दुसरीकडे मात्र ज्या उद्देशाने शासनाने ही योजना अमलात आणली तो उद्देश फोल ठरणार आहे. तालुक्यात कागदोपत्रीच योजना राबवून फक्त शासनाला चुना लावण्याचे काम सर्वांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shatakoti tree plantation scheme in Chandurbazar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.