महापालिकेतील ‘ती’ एजन्सी ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:55+5:302021-07-12T04:09:55+5:30

अमरावती : महापालिकेत कुशल, अर्धकुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी नेमली जाणारी एजन्सी ही कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) च्या यादीत ब्लॅक ...

The 'she' agency in the corporation is blacklisted by ESIC? | महापालिकेतील ‘ती’ एजन्सी ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड?

महापालिकेतील ‘ती’ एजन्सी ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड?

Next

अमरावती : महापालिकेत कुशल, अर्धकुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी नेमली जाणारी एजन्सी ही कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) च्या यादीत ब्लॅक लिस्टेड असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने मंजूर केलेल्या आठपैकी ‘त्या’ एजन्सीच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महापालिकेत दरमहा सेवानिवृत्तांची संख्या वाढतच आहे. दुसरीकडे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांसाठी मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘आऊट साेर्सिंग’द्वारे मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता निविदा प्रक्रियादेखील राबविली. एजन्सी निश्चित करताना प्रशासनाची दमछाक झाली आणि सोल्यूशन निघाले. मात्र, प्रशासनाने ‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळ कंत्राट देण्याचा निर्णय घेतलेली ही एजन्सी ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड असल्याने पुन्हा भानगडी वाढणार आहे. स्थायी समितीत याविषयी घमासान होईल. एजन्सी निवड प्रक्रिया समितीने अटी-शर्ती तपासल्या अथवा नाही, याबाबत शंका उपस्थित होतील. तूर्त महापालिका प्रशासनाने ‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळ कंत्राट कोणत्या एजन्सीला सोपविला, हे अद्यापही जाहीर केले नाही. परंतु, राजकीय दबावात छुप्या मार्गाने महापालिकेने मंजूर केलेली ‘ती’ एजन्सी ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड असल्याची माहिती समोर आली आहे. किंबहुना ईएसआयसीत ब्लॅक लिस्टेड एजन्सीची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.

----------------

आता स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळ कंत्राट सोपविण्यासाठी महापालिका प्रशासनाने एजन्सी निश्चित केली आहे. मात्र, याबाबत आता स्थायी समिती कोणता निर्णय घेते, याकडे नजरा लागल्या आहेत. मनुष्यबळासाठी एजन्सी निश्चित झाल्याची माहिती एका बड्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. काही दिवसांपासून महापालिकेत ‘आऊट साेर्सिंग’वरून राजकारण तापले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असे द्वंद्व सुरू झाल्याचे चित्र आहे.

-------------

या आठ एजन्सी होत्या स्पर्धेत

महापालिकेत ‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळासाठी आठ एजन्सी स्पर्धेत होत्या. छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार संस्था (नांदेड), जानकी सुशिक्षित (अमरावती), महात्मा फुले (पभरणी), स्वस्तिक संस्था (अमरावती), क्षितिज सेवा सहकारी (अमरावती), ईटकॉन्स ई-सोल्यूशन्स (नोयेडा), पटेल काॅन्ट्रॅक्टर्स (नागपूर), श्रीपाद अभियांत्रिकी (यवतमाळ) यांचा समावेश आहे.

-----------

Web Title: The 'she' agency in the corporation is blacklisted by ESIC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.