‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून ती राहिली गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:57+5:30

ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्यासाठी ३० हजार रुपयेदेखील त्याने पीडिताच्या भावाकडून ऑनलाईन घेतले. त्यानंतर प्रेमसंबंध गहिरे झाले व ते एकाच खोलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.

She became pregnant through a live-in relationship | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून ती राहिली गर्भवती

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून ती राहिली गर्भवती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मीडियावर झालेली ओळख, घट्ट मैत्री, त्यातून लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाचे आमिष, बळजबरी व त्यातून पोटी अंकुरलेला त्याचा गर्भ. ओळखीपासून सुरू झालेला हा प्रेमाचा ‘डेली एपिसोड’ अखेर त्याला गजाआड घेऊन गेला. त्याला कारणीभूत ठरला तो त्याने तिचा केलेला विश्वासघात! दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ‘सिलसिल्या’चे असे विश्वासघातकी ‘ब्रेकअप’ झाले आहे.
 गर्भवती राहिल्यानंतरही त्याने ‘ तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतल्याने त्या तरुणीने मकरसंक्रांतीदिनी रात्री गाडगेनगर ठाणे गाठले. आपबिती सांगितली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी धीर देत तक्रार नोंदवून घेतली अन् आरोपी राहुल हरिदास कळसकर (३५, वाठोडा, ता. भातकुली) याच्याविरुद्ध कलम ३७६ (२), एन, ४२०, ५०६ ब, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला. लागलीच आरोपीला अटक करण्यात आली. २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत त्याने तिचे सर्वस्व लुटले.तक्रारीनुसार, पीडिताची आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली. ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्यासाठी ३० हजार रुपयेदेखील त्याने पीडिताच्या भावाकडून ऑनलाईन घेतले. त्यानंतर प्रेमसंबंध गहिरे झाले व ते एकाच खोलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.

...म्हणे आम्ही नवरा-बायको
अमरावती शहरात भाड्याने एका खोलीत राहत असताना त्याने आपण नवदाम्पत्य असल्याची बतावणी शेजाऱ्यांना केली. लोकांना खोटे का सांगतो आहे, अशी विचारणा करणाऱ्या पीडितेला त्याने मारहाण व शिवीगाळदेखील केली. तो तिला महाविद्यालयातदेखील जाऊ देत नव्हता. 

पीडिताच्या आईची आर्थिक फसवणूक
लग्न करण्याची बतावणी करून त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध केले. त्यातून ती गर्भवती राहिली. त्याचा विश्वासघातकीपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडिताच्या आईकडून महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी ५० हजार रुपये घेतले, मात्र शुल्क भरले नाही. 

केवळ विश्वासघात
आधी मदतीचा बहाणा करून त्याने आपल्याशी मैत्रीचे सूर जोडले. मग लग्नाच्या आणाभाका घेतल्या. शरीरसंबंध जोडले. त्यातून गर्भवती राहिल्यानंतर त्याचे सूरच बदलले; ती डोळ्यात प्राण आणून महिला पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होती.

 

Web Title: She became pregnant through a live-in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.