‘ती’ देवचिमणी कातिणीचे तीन आठवड्यांचे खाद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:15 PM2018-12-03T22:15:03+5:302018-12-03T22:15:22+5:30
सातपुड्याच्या घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘जायंट वूड’ हे कॉमन नाव असून त्याचे वैज्ञानिक नाव हे ‘नेफिला पिलीपीस’ स्पायडर आहे. त्याच्या जाळ्यात ‘देवचिमणी’ अडकली आहे. सेमाडोह जंगलात शुक्रवारी ही बाब चिखलदरा येथील वनप्रशिक्षण महाविद्यालयाच्या चमुला निदर्शनास आली.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सातपुड्याच्या घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘जायंट वूड’ हे कॉमन नाव असून त्याचे वैज्ञानिक नाव हे ‘नेफिला पिलीपीस’ स्पायडर आहे. त्याच्या जाळ्यात ‘देवचिमणी’ अडकली आहे. सेमाडोह जंगलात शुक्रवारी ही बाब चिखलदरा येथील वनप्रशिक्षण महाविद्यालयाच्या चमुला निदर्शनास आली. कातीण ही त्या देवचिमणीला तीन आठवड्यांपर्यंत आपले भक्ष्य बनविणार असल्याची माहिती दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा कोळी संशोधक अतुल बोडखे यांनी सांगितले.
सातपुड्यात ‘नोफिला पिलीपिस’ नावाचा स्पायडर हा कॉमन असून, या ठिकाणी दाट जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा ‘स्पायडर अडीच ते तीन मीटरचे जाळे दोन झाडांच्या मध्ये विणतो. त्याकारणाने या प्रजातीला ‘जायंट वूड’ स्पायडर असे म्हणतात.
जेथे घनदाट जंगले आहेत, त्या ठिकाणी १० बाय १० मीटर चौकणाचा विचार केला तर २० ते २५ जाळे आढळून येतात. त्यामध्ये शुक्रवारी अडकलेल्या देवचिमणीला तो स्पायडर त्याच्या जाळ्याने अधिक घट्ट बांधेल. त्या पक्षाच्या शरीरात तो विष सोडेल. त्याच्या विषात मोठ्या प्रमाणात त्या पक्षाच्या मासांला विघटित करणारे ‘एन्झायम्स’ असल्याने त्याला विघटन होण्यास मदत होईल. विघटित झालेल्या पक्षाच्या शरीराला तो पुन्हा जाळ्याने त्याला विणलेल्या जाळ्यावर घट बांधून ठेवेल. तसेच तो त्यातील द्रव्यशोषन करेल. त्याच बरोबर काही छोटे स्पायडर क्लेप्टोपॅरासाईट (आरगारोड्स नावाचे स्पायडर) असेही म्हणतात. ते अत्यंत छोटे असून ते स्वत:चे जाळे तयार न करता जायंट वूड स्पायडरच्या जाळ्यावर ते बसतात आणी जायंट वूड स्पायडरने जमा केलेले खाद्य ते खातात. त्याचप्रमाणे इतर स्पायडरलाही त्या भक्ष्याचा आस्वाद घेता येतो.
अशी मिळाली देवचिमणीची माहिती
मेळघाटच्या जंगलात शुक्रवारी चिखलदरा येथील वनप्रशिक्षण संस्थेची चमू सेमाडोह परिसरातील कुंवापाटी कॅम्प ते बिच्छुखेडादरम्यान पायी ट्रॅक करीत होते. जवळपास १९ किलोमिटपर्यंत घनटात जंगल गाठल्यावर त्यांची नजर जुळया झाडांतील बेफाटीत अंधातरी काही तर अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ठिकाणी त्यांना कातिणीने घट्ट विणलेल्या जाळयात तिच्यापेक्षा कितीतरी मोठी काळ्या रंगाची देवचिमणी अडकलेली दिसली. राज्यातील फॉरेस्ट प्रशिक्षण फॉरेस्ट ट्रेनिंग संस्थेमार्फेत चिखलदरा येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. आॅक्टोंबर ते जानेवारी दरम्यान अशा कातिणीच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या ठिकाणी इतर वन्यजीवांशी त्यांचा काय संबध आहे. त्या दृष्टीकोणातून संशोधन होणे गरजेचे असल्याचे कोळी संशोधकांचे मत आहे.
देवचिमणीला तो तीन आठवड्यापर्यंत भक्ष्य करेल. देशात अशा स्पायडरच्या प्रजाती किती आहेत, ही संख्या पुढे येणे गरजेचे आहे.
- अतुल बोेडखे,
कोळी संशोधक