‘ती’ सासरी जाणार नाही, आईसोबत माहेरी राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:05+5:302021-02-20T04:37:05+5:30

चांदूर बाजार- तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी रवी पर्वतकर याची फारकत झालेली पत्नी हर्षा हिने सासरी राहण्याचे ...

‘She’ will not go to her mother-in-law, she will stay with her mother! | ‘ती’ सासरी जाणार नाही, आईसोबत माहेरी राहणार!

‘ती’ सासरी जाणार नाही, आईसोबत माहेरी राहणार!

Next

चांदूर बाजार- तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी रवी पर्वतकर याची फारकत झालेली पत्नी हर्षा हिने सासरी राहण्याचे पोलिसांसमोर दिलेले बयान शुक्रवारी न्यायालयात फिरवले. आरोपी रवीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांना बयान देतेवेळी आरोपी समोर असल्याने घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना सासरी जाण्याचे बयान दिले होते. अशी कबुली हर्षाने न्यायालयात दिली. यामुळे आरोपीवर अपहरणाचा गुन्हा कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी रवि यानेच आपले वडील, भाऊ तसेच आजोबावर चाकूने वार केल्याचे सांगून त्यानेच मला जबरीने पळवून नेल्याचे बयान फारकत झालेली पत्नी हर्षाने न्यायालयासमोर दिले आहे. तसेच सासरी जाणार नसल्याने तिला आई मीरा साबळे यांच्या स्वाधीन केल्याची माहिती चांदुर बाजार पोलिसांनी दिली.

तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पकडून न्यायालयात सादर केल्या नंतर त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर हत्याकांडात वापरलेला चाकू कुरळ पूर्णा फाट्यावरून पोलिसांनी हस्तगत केला. आरोपी रवीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पत्नीला आणण्यासाठी कुरळ पूर्णा गेलो असता सासरे व मेहुण्याने अडवून मला मारहाण केल्याने रागाच्या भरात त्यांना चाकूने मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दुहेरी हत्येनंतर अमरावतीला रवाना

सासरा व साळ्याची हत्या केल्यानंतर आरोपी रवी हा घटस्फोटित पत्नी हर्षाला घेऊन एम एच २७ बियु १८६६ या दुचाकीने अमरावतीला गेला. तिथे त्याने आपली दुचाकी मित्राला देऊन एका बसने अमरावतीहून शिवाजीनगर पुणे येथे पोहोचला. तिथे चुलत भावाकडे पाणी प्यायला व तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. १७ फेब्रुवारी पहाटे तीन वाजता आरोपी रवि व हर्षाला चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आले

Web Title: ‘She’ will not go to her mother-in-law, she will stay with her mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.