बेघर-निराधारांना दिला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:55 AM2018-01-12T00:55:06+5:302018-01-12T00:55:19+5:30

थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना रात्र निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या पुढाकाराने अशा नागरिकांना रुग्णवाहिकेद्वारे रात्र निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे.

Shelter given to homeless refugees | बेघर-निराधारांना दिला निवारा

बेघर-निराधारांना दिला निवारा

Next
ठळक मुद्देरात्र निवारा केंद्राचा आधार : महापालिका आयुक्तांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना रात्र निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या पुढाकाराने अशा नागरिकांना रुग्णवाहिकेद्वारे रात्र निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे.
थंडीमुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी महापालिका व पब्लिक एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटीतर्फे संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे बडनेरा येथील रात्र निवारा केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. असे नागरिक आढळल्यास सामाजीक कार्यकर्ता सुशीलदत्त बागडे, कार्यक्रम समन्वयक ज्योती राठोड, स्वप्निल धुरंदर व संजय धवणे यांच्या ९३७२४७०९०८, ९९७५७३७४४७, ७०२८६२६११६ किंवा ८८५५९३८००६ या क्रमांकावर संपर्क करावा.

Web Title: Shelter given to homeless refugees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.