शेंदूरजनाघाट दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:02 PM2018-05-18T22:02:45+5:302018-05-18T22:02:45+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत देशपातळीवरील ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये पश्चिम विभागातून शेंंदूरजनाघाट शहर दुसºया स्थानावर राहिले.

Shendurjnaghat second position | शेंदूरजनाघाट दुसऱ्या क्रमांकावर

शेंदूरजनाघाट दुसऱ्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये देशपातळीवर यश

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत देशपातळीवरील ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये पश्चिम विभागातून शेंंदूरजनाघाट शहर दुसऱ्या स्थानावर राहिले.
देशभरातील ४०४१ स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेंतर्गत शेंदूरजनाघाट शहराची तपासणी जानेवारी महिन्यात केंद्रस्तरीय समितीकडून झाली. शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. शहरातील नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी शहरातील शाळा आणि घरोघरी भेट देऊन याबाबत जनजागृती करून शहर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नगर परिषदेने नेमणूक केलेले शहर स्वच्छतादूत हितेश ढोरे तसेच सुभाष गोरडे, प्रशांत भंडारे, शुभम अकर्ते, अनिकेत कपिले, अंजली गुल्हाने यांनी शहरातील जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यास मोलाचे कार्य केले.
नगर परिषद अध्यक्ष रूपेश मांडवे व मुख्याधिकारी संजीव ओहोळ, यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. उपाध्यक्ष सतीश अकर्ते, विशाल सावरकर, नीलिमा कांडलकर, धनराज अकर्ते, रेखा अढाऊ, अनिसखान शेरखान, जया श्रीराव, राकेश दवंडे, राजश्री डोईजोड, मंदा वसुले, मंगल पधराम, मोनिका भोंगाडे, सुभाष गोरडे, सारिका बेलसरे, भूपेंद्र कुवारे, सुनिता वंजारी, हर्षा घोरपडे, गजानन कपले, जयप्रकाश भोंडेकर, आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, शेंदूरजनाघाट शहराकरिता आयुक्त कार्यालयाकडून नेमून दिलेले शहर समन्वयक हर्षल भागवत, विनय मालधुरे, प्रीतम सोनटक्के यांच्यासह कर्मचारी, नागरिकांचा या यशात मोलाचा वाटा आहे.

Web Title: Shendurjnaghat second position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.