वनमंत्र्यांच्या पुढ्यात मांडल्या मेंढपाळांनी समस्या
By Admin | Published: July 8, 2017 12:21 AM2017-07-08T00:21:09+5:302017-07-08T00:21:09+5:30
वनविभागाकडून मेंढपाळांवर होणारा अन्याय, दहशतवादी वागणूक थांबविण्यात यावी,
निवेदन : उदरनिर्वाहाचे साधन हिरावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: वनविभागाकडून मेंढपाळांवर होणारा अन्याय, दहशतवादी वागणूक थांबविण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांनी शुक्रवारी राज्याचे वन, अर्थमंत्री सुधीन मुनगंटीवार यांची भेट घेतली. वनाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अमानुष वागणुकीचा पाढा वाचला. दरम्यान वनाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली.
ना. मुनगंटीवार हे दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामभवनात शुक्रवारी भाजपचे नेते अरुण अडसड यांच्या नेतृत्वात मेंढपाळानी त्यांची भेट घेतली. वनाधिकाऱ्यांकडून खोटी प्रकरणे दाखल करून मेंढपाळांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी रंगराव शिंदे, निंभा कोकरे, रघुनाथ कोकरे, मंगेश बिचुकले, वामन थोरात, मोहन थोरात, विलास केसकर आदी उपस्थित होते.