शिरजगाव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवी रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:17+5:302021-07-12T04:09:17+5:30
शिरजगाव कसबा आरोग्य केंद्रांमध्ये सर्फापूर, पाळा, देऊरवाडा, माधान, काजळी, थुगाव ही गावे आहेत. शिरजगाव कसबापासून अमरावती ७० किलोमीटर ...
शिरजगाव कसबा आरोग्य केंद्रांमध्ये सर्फापूर, पाळा, देऊरवाडा, माधान, काजळी, थुगाव ही गावे आहेत. शिरजगाव कसबापासून अमरावती ७० किलोमीटर दूर असल्याने गर्भवती महिला तसेच अपघातात गंभीर जखमी रुग्ण यांना अमरावती रेफर करण्यात फार मोठी अडचण निर्माण झाली हाेती.
रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आरोग्य सभापती मनोहर सुने होते. जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती नितीन टाकरखेडे, रुग्ण कमिटी सदस्य संजय थेलकर, निर्मला निमकर, वैद्यकीय अधिकारी अपर्णा झोड, ओम कुऱ्हाडे, साहेबराव अस्वार, बबनराव झाडे, राहुल कविटकर व आरोग्य केंद्राचे कर्मचारी हजर होते. रुग्णवाहिका चालक योगेश निचत यांचा जिल्हा परिषद सदस्य पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.