शिरखेड पोलिसांनी आवळल्या दुचाकीचोरांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:57+5:302021-08-20T04:16:57+5:30

फोटो - शिरखेड शिरखेड : मोर्शी तालुक्यातील निंभी येथून दुचाकी चोरून विकणाऱ्या तिघांशिवाय त्या विकत घेणाऱ्या विविध ठिकाणच्या सात ...

Shirkhed police nab two bike thieves | शिरखेड पोलिसांनी आवळल्या दुचाकीचोरांच्या मुसक्या

शिरखेड पोलिसांनी आवळल्या दुचाकीचोरांच्या मुसक्या

Next

फोटो - शिरखेड

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील निंभी येथून दुचाकी चोरून विकणाऱ्या तिघांशिवाय त्या विकत घेणाऱ्या विविध ठिकाणच्या सात जणांकडून शिरखेड पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या.

पोलीस सूत्रांनुसार, अक्षय गंगाधरराव दवंडे (२४, रा. साखरपुरा, ता. वरूड) या विद्यार्थ्याने १५ ऑगस्ट रोजी शिरखेड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदविली होती. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याचा धाकटा भाऊ सनद गंगाधरराव दवंडे हा अमरावती येथे महाविद्यालयाच्या कामानिमित्त गेला होता. रात्री ०९.३० च्या सुमारास वरूड येथे परत येत असताना त्याची मोपेड (एमएच २७ बीयू ८४८२) निंभीपुढे आसोना फाट्याजवळ पंक्चर झाल्याने त्याचा मित्र प्रतीक गायकी याच्या वीटभट्टीवर ठेवली होती. त्यानंतर अक्षयच्या दुचाकीवर तो वरूड येथे निघून गेला. दुसऱ्या दिवशी मोपेड गाडी तेथे दिसून आली नाही. या तक्रारीवरून ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपास सुरू केला. प्रतीक शरद गायकी (रा. निंभी) याच्या घरझडतीत एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी आढळल्या. त्याने शुभम बाळासाहेब लोखंडे (२३, रा. नेताजी वाडी चौक, आर्वी जि. वर्धा) व शुभम अरुण कदम (रा. भादोड पुनर्वसन, आर्वी, जि. वर्धा) या सहकाऱ्यांची नावे सांगितली. शिरखेड पोलिसांनी तिघांची १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान पोलीस कोठडीत चौकशी करून ११ दुचाकी जप्त केल्या. यात एमएच २७ बीसी ४५४३, एमएच २७ बीसी ४५४३,

एमएच २७ बीयू ८४८२, एमएच २७ एजे ०५९९, एमपी ४८ एमडब्ल्यू ६५१९, एमएच २७ एएच ३६९०, एमएच २७ बीएन ९२५४, एमएच ३२ एएम ५६९७ व तीन विनाक्रमांकाच्या दुचाकींचा समावेश आहे. ५ लाख ४० हजारांचा हा मुद्देमाल आहे. चोरीच्या दुचाकी विकत घेणारे मंगेश रामराव गायकी (३८, रा. इनापूर), अर्पण विलासराव पाथरे (२४, रा. लाडकी), प्रफुल्ल अशोक बहुरूपी (३२, रा. बोडना), सैयद इकबाल सैयद कादर (२६, रा. गिट्टीखदान, मोर्शी), नीलेश रंगराव वागद्रे (२६, रा. पाळा), भूषण महादेवराव राजुरकर (२५, रा निंभी), रवींद्र प्रभाकरराव कडू (४७, रा. महाराष्ट्र कॉलनी) यांनासुद्धा भादंविचे कलम ४११ अन्वये अटक करण्यात आली. दुचाकी जेथून चोरल्या, त्या पोलीस ठाण्यांनाही कळविण्यात आले आहे.

शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे, पोलीस अंमलदार मनोज टप्पे, छत्रपती करपते, अनूप मानकर, रामेश्वर इंगोले, अमित आवारे, उमेश कुंभेकर यांनी ही कामगिरी केली.

कोट

चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दुचाकीचोरांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीप्रकरणी संबंधित ठाण्यांना सुपूर्द केले जाणार आहे.

- केशव ठाकरे, ठाणेदार शिरखेड

Web Title: Shirkhed police nab two bike thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.