पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 02:38 PM2023-01-16T14:38:21+5:302023-01-16T14:38:40+5:30

बेंबडा प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आंदोलन

Shiv Sainiks of Thackeray group in Amravati aggressive on crop insurance issue; Warning of mass drowning | पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा

पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा

googlenewsNext

डॉ. संजय जेवडे

नांदगाव खडेश्वर (अमरावती) : पिक विम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. बेंबळा प्रकल्पात कमरेएवढ्या पाण्यात उतरून आंदोलन करत सामूहिक जलसमाधीचा इशारा दिला आहे.

सरकार आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची दखल घेत पिक विमा दिला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. शिवसैनिकांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली असून परिसरात मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान नदीत उतरून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली आहे. प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

Web Title: Shiv Sainiks of Thackeray group in Amravati aggressive on crop insurance issue; Warning of mass drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.