युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्याकडून शिवसैनिकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:40 PM2019-04-21T22:40:02+5:302019-04-21T22:40:08+5:30
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
अंजनगाव सुर्जी : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्ता हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.
तालुक्यातील मु-हादेवी येथील राहुल अरुण पखाण (२७) याने फेसबुकवर अमरावती लोकसभेच्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाविरोधात पोस्ट अपलोड केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. २० एप्रिलच्या रात्रीला यावरून वाद उफाळून आला.
राहुल पखाण यांच्या गावातीलच आठवडी बाजारातील आई भवानी पान टपरीवर जाऊन आरोपी मंगेश कोकाटे व अजय देशमुख तसेच इतर तीन ते चार तरुणांनी राहुलला बेदम मारहाण केली. राहुलच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३२३, ४२७, १४३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी पसार झाले आहेत.
सदर प्रकरणातील आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
- नरेंद्र्र डंबाळे, प्रभारी ठाणेदार
गावकऱ्यांची ठाण्यावर गर्दी
सदर युवकाला मारहाण करून आरोपी तरुण पसार झाल्यानंतर मुºहादेवी येथील गावकºयांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.