शिवसेनेने केला पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:29 AM2020-12-13T04:29:39+5:302020-12-13T04:29:39+5:30
(बातमी रिपीट झालेली आहे. यापूवीर् दखणे यांनी बातमी दिलेली आहे) अमरावती : शिवसेनेने शनिवारी येथी राजकमल चौकात पेट्रोल, ...
(बातमी रिपीट झालेली आहे. यापूवीर् दखणे यांनी बातमी दिलेली आहे)
अमरावती : शिवसेनेने शनिवारी येथी राजकमल चौकात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली तसेच शेतकरी आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या फलकाला शिवसैनिकांनी बदडून रोष व्यक्त केला. जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी आर्थिक कात्री लागली आहे. केंद्र सरकारचे तेल कंपन्यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्या करीत असून, दररोज दरवाढ करीत आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे शनिवार निदर्शने करण्यात आली. यादरम्यान कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी घेऊन दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या फलकाला चपलांनी बदडले. याप्रसंगी माजी आमदार श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रवीण हरमकर, भारत चौधरी, पंजाबराव तायवाडे, जयंत इंगोले, दिनेश चौधरी, दिगंबर मानकर, विकास शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.