शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका
By गणेश वासनिक | Published: July 16, 2023 04:26 PM2023-07-16T16:26:44+5:302023-07-16T16:27:04+5:30
Amravati: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला.
- गणेश वासनिक
अमरावती - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत पानटपरी, शेताचे बांध आणि शहरातील मुख्य चौकाचौकात तसेच, महानगरातील प्रभाग-प्रभागातील चौकात चर्चेच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या संवादातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, आश्वासनांची पोलखोल करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या योजनांचा पाढाच वाचला, असा दावा शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी केला.
यावेळी संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी खासदार अनंत गुढे, सहसंपर्कप्रमुख दिनेश बूब, जिल्हाप्रमुख मनोज कडू, श्याम देशमुख, नाना नागमोते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, वर्षा भोयर, आसावरी देशमुख, प्रतिभा बोपशेट्टी, आशिष धर्माळे, कपिल देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, स्वराज ठाकरे, प्रदीप बाजड, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र निर्मळ, प्रवीण अळसपुरे, नितीन हटवार, गोपाल राणे, विजय ठाकरे, सुनील राऊत, राजेश शर्मा, राहुल माटोळे, उमेश घुरडे, विजय बेनोडकर, अशोक इसळ, नितीन तारेकर आदी उपस्थित होते.