‘शिवाजी’चे शाळा,महाविद्यालय सौरऊर्जेने लखलखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:18 PM2018-12-27T22:18:31+5:302018-12-27T22:19:01+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दररोज ०.४ मेगावॅट विद्युत लागते. संस्थेचे अध्यक्ष हे माझे विधानसभेतील सहकारी राहिले आहेत. त्यांनीच सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव द्यावा, ५० टक्के अनुदान आजच जाहीर करतो, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंत्युत्सवात दिली.

Shivaji's school, college solar powered! | ‘शिवाजी’चे शाळा,महाविद्यालय सौरऊर्जेने लखलखणार!

‘शिवाजी’चे शाळा,महाविद्यालय सौरऊर्जेने लखलखणार!

Next
ठळक मुद्देभाऊसाहेबांचा जयंत्युत्सव : संस्थेचा प्रस्ताव पाठवा, ५० टक्के अनुदानाची ऊर्जामंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दररोज ०.४ मेगावॅट विद्युत लागते. संस्थेचे अध्यक्ष हे माझे विधानसभेतील सहकारी राहिले आहेत. त्यांनीच सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव द्यावा, ५० टक्के अनुदान आजच जाहीर करतो, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंत्युत्सवात दिली.
संस्थेचा विद्युत कर माफ करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी भाषणादरम्यान केली. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र संस्थेने आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा. संस्थेला २५ वर्षे विद्युत बिल भरण्याची गरज पडणार नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगताच उपस्थितांनी त्याला दाद दिली. भाऊसाहेबांच्या १२० व्या जयंत्युत्सवानिमित्त संस्थेचेच माजी विद्यार्थी ना. बावनकुळे विशेष आकर्षण होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अन् भाऊसाहेब यांच्या विचारांचा सार असल्याचे संस्थाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.
पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य शीतल यदुराज मेटकर व चमुने नरसी मेहता व राष्टवंदनेवर अप्रतिम ओडीसी नृत्य सादर केले. राजेश उमाळे यांनी स्वागत-गौरवगीत सादर केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी व अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेबांना आतापर्यंत ‘भारतरत्न’ का नाही?
भाऊसाहेबांचे कार्य मोठे आहे. शासनाला त्याची माहिती आहे. पण, आतापर्यंत भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ का जाहीर केले नाही, असा थेट सवाल श्रोत्यांमध्ये बसलेले सामाजिक कार्यकर्ते बबनराव गुडधे यांनी ऊर्जामंत्र्यांना भाषणाच्या सुरुवातीलाच केला. मंत्रिमहोदयांनी याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ मिळायला हवे, ही सर्वांची हार्दिक इच्छा असल्याने उपस्थितांनी गुडधे यांचे समर्थन केले.
अनंत पंजाबराव देशमुख प्रशासकीय अकादमी
भाऊसाहेबांचे पुत्र अनंत देशमुख यांचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी संस्थेने त्यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा अकादमीची स्थापना केली आहे. अकादमीतून प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण युवकांसाठी ही मोठी उपलब्धी राहणार असल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख याप्रसंगी म्हणाले. अनंत पंजाबराव देशमुख अकदमीचे उद्घाटन ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.

Web Title: Shivaji's school, college solar powered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.