अक्षयच्या खुनी हल्ल्याविषयी शिवानीचे नातेवाईक गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:52 PM2018-08-28T21:52:49+5:302018-08-28T21:53:27+5:30

दूरच्या नात्यातील अक्षय आपल्या मुलीशी लग्न करण्याच्या मनसुब्यात आहे, याची भनक असली तरी शिवानीचे कुटुंबीय अक्षय अशा पातळीवर उतरेल, याबाबत गाफील राहिले. शिवानीशी लग्न करण्याची तीव्र इच्छुक असणारा अक्षय तिच्यावर खुनशी हल्ला चढवेल मोठे पाऊल उचलेल, याचा अंदाज कधी आला नाही; मात्र आता यापुढे आपल्या कुटुंबाविषयीची प्रत्येक बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊनच पाऊ ल उचलू, अशी भूमिका तिच्या वडिलांची आहे.

Shivani's relative is unaware of the assassination of Akshay | अक्षयच्या खुनी हल्ल्याविषयी शिवानीचे नातेवाईक गाफील

अक्षयच्या खुनी हल्ल्याविषयी शिवानीचे नातेवाईक गाफील

Next
ठळक मुद्देखोलापुरी गेट हद्दीतील खुनशी हल्लाप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दूरच्या नात्यातील अक्षय आपल्या मुलीशी लग्न करण्याच्या मनसुब्यात आहे, याची भनक असली तरी शिवानीचे कुटुंबीय अक्षय अशा पातळीवर उतरेल, याबाबत गाफील राहिले. शिवानीशी लग्न करण्याची तीव्र इच्छुक असणारा अक्षय तिच्यावर खुनशी हल्ला चढवेल मोठे पाऊल उचलेल, याचा अंदाज कधी आला नाही; मात्र आता यापुढे आपल्या कुटुंबाविषयीची प्रत्येक बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊनच पाऊ ल उचलू, अशी भूमिका तिच्या वडिलांची आहे.
टाइल फिटिंग करणारे सुनील वासनकर पत्नी व दोन मुलांसह तारखेडा परिसरात राहतात. जेमतेम आर्थिक स्थितीत त्यांनी आपली मुले लहान्याची मोठी केली. समाजात वावरताना सजग राहण्याचे धडे त्यांना दिले. त्यामुळेच आपल्या कच्छपी लागलेल्या अक्षयला शिवानीने ठामपणे नकार दिला. तो त्याला झोंबला. आपल्या जीवनात इतके मोठे संकट उभे राहील, याची कल्पनाच सुनील वासनकर यांना नव्हती. सहा ते आठ महिन्यांपूर्वी एका लग्न समारंभात अक्षयने शिवानीला पाहिले होते. नात्यात असल्याने अक्षयने एका नातेवाइकाच्या माध्यमातून शिवानीशी लग्न करण्याचा प्रस्ताव वासनकर कुटुंबासमोर ठेवला. मात्र, अक्षय जेमतेम स्थितीमुळे आपल्या मुलीचे योग्यरित्या पालनपोषण करू शकणार नाही, हे वासनकर यांनी ताडले. त्यामुळे त्यांनी लग्नास नकार दर्शविला. अक्षयने यादरम्यान शिवानीशी संबंध वाढविण्याचे प्रयत्न केले. तिच्याशी बोलण्यासाठी कॉलेज व शिकवणी वर्गापर्यंत पाठलाग करू लागला. राजापेठ परिसरातील नातेवाइकाकडे अक्षय येत होता. त्यादरम्यान तो कॉलेज व शिकवणी वर्गासाठी येत असलेल्या शिवानीचा पाठलाग करीत होता. तिचा नकार होता, तर एकतर्फी प्रेमातून अक्षय जिद्दीला पेटला होता. त्याला वासनकर कुटुंबीयांनी एका नातेवाइकाच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नातेवाइकानेच अक्षयला प्रोत्साहित केले. त्यामुळे अक्षयचे धाडस वाढले. दरम्यान, शिवानीच्या लग्नासाठी वासनकर कुटुंबीय कामी लागले होते. ही बाब अक्षयच्या कानावर पडली असावी. शिवानी आता आपल्या हाती लागणार नाही, या मानसिकतेत असणाऱ्या अक्षयने अखेर शिकवणी वर्ग आटोपून आपल्या घरी जाणाºया शिवानीवर सोमवारी दुपारी खोलापुरी गेट ठाण्याच्या मागील रोडवरच गाठले. तिची मैत्रीण सोबतच होती. माझ्या मैत्रिणीचा पिछा सोडून दे, असे तिने म्हटलेसुद्धा. मात्र, आमच्यामध्ये पडू नको, असे म्हणत अक्षयने जवळील चाकू काढून थेट शिवानीच्या गळ्यावर वार केले.
शिवानीची प्रकृती स्थिर
शिवानी वासनकर हिला गंभीर अवस्थेत गॅलक्सी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गळ्यावर चाकूचे वार हे पाच सेंटिमीटर रुंद आणि २० सेंटिमीटर लांब आहेत. तिच्या श्वाननलिकेला कापली गेली नसली तरी नलिकेला इजा झाली आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाºया नलिका कापल्या गेल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. सद्यस्थितीत तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गॅलक्सी हॉस्पिटलचे दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आशिष डगवार यांनी सांगितले. तिची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर ती बोलू शकेल.
त्याला नव्हता थोडाही पश्चात्ताप
शिवानीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अक्षय पुरुषोत्तम कडू (२२, रा. शिरजगाव बंड) याला खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली. शिवानीने लग्नास नकार दिल्याने हा हल्ला केल्याची कबुली अक्षयने पोलिसांना दिली. मात्र, शिवानीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा थोडासाही पश्चात्ताप अक्षयच्या चेहºयावर नव्हता. उलट तो हसत-हसत उत्तरे देत होता. शिवानीला चाकू मारल्यानंतरही तो हसत होता, असे परिसरातील प्रत्यक्षदर्शी सांगत होते. अक्षयला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ३१ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Shivani's relative is unaware of the assassination of Akshay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.