शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:59+5:302021-06-04T04:10:59+5:30

अमरावती : काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली. ३१ मे ...

Shivbhojan plate satisfies the hunger of over one and a half lakh citizens | शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

Next

अमरावती : काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात २४ केंद्रांवर १ लाख ६१,६५२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील गोरगरीब, गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार मिळाला आहे.

याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या प्रार्श्वभूमीवर रोजंदारीच्या कामावर जाणारे गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्यात. शिवभोजन थाळी ही त्यापैकी एक आहे. याआधी शिवभोजन थाळी ही पाच रुपयाला उपलब्ध होती. निर्बंधाच्या कालावधीत हीच थाळी मोफत आणि पार्सलव्दारे उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील २४ केंद्रांव्दारे जिल्हाभरातील १ लाख ६१ हजार ६३२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मोफत थाळीचे वितरण १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

बॉक्स

असे मिळते जेवण

शिव भोजन थाळी मध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, शंभर ग्रॅमची एक वाटी भाजी,१५० ग्रॅम भात आणि शंभर ग्रॅमचे एक वाटी वरण एवढे भोजन दिले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात एकूण २४ केंद्रे

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील १४ तालुक्यात १८ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आहेत. यात अमरावती शहरात ५ आणि बडनेरा येथे १ व ग्रामीण भागातील विविध तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे १८ भोजन केंद्र सुरू आहेत.

Web Title: Shivbhojan plate satisfies the hunger of over one and a half lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.