ब्राह्मणवाडा थडी येथे तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:16+5:302021-06-26T04:10:16+5:30

ब्राह्मणवाडा थडी : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दरवर्षीप्रमाणे श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ...

Shivrajyabhishek ceremony as per date at Brahmanwada Thadi | ब्राह्मणवाडा थडी येथे तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा

ब्राह्मणवाडा थडी येथे तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा

Next

ब्राह्मणवाडा थडी : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दरवर्षीप्रमाणे श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा सोहळा पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक आशिष बिजवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मशाली पेटवून तसेच भगव्या पताका व तोरण लावून वातावरण शिवमय करण्यात आले. राज्यभिषेक आटोपल्यानंतर आकाश दाभाडे यांनी शिवगारद केली तसेच जयघोष करण्यात आला. आरती व पोवाडे

गायिले गेले. चांदूर बाजार येथील गजानन महाराज सेवा समितीचे सेवेकरी मदन तिरमारे तसेच शिवव्याख्याते सचिन बऱ्हाणकुडे यांनी शिवचरित्रावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तुषार सातपुते व आभार प्रदर्शन अभिषेक पकळे यांनी केले. या कार्यक्रमाला सूरज इंगोले, शिवम सापधारे, तेजस रेखाते, प्रज्वल दामेधर, चेतन पोटे, प्रफुल पोकळे, अतुल लहाने, देवानंद दहिकर, राहुल निचत, रोशन सोनोने यांनी सहकार्य केले.

Web Title: Shivrajyabhishek ceremony as per date at Brahmanwada Thadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.