शिवसेनेत खांदेपालट !

By admin | Published: January 11, 2015 10:41 PM2015-01-11T22:41:28+5:302015-01-11T22:41:28+5:30

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अंतर्गत वादामुळेच शिवसेनेला हे वाईट दिवस आले आहेत. आता पुन्हा नव्या दमाने संघटनात्मक बांधणीसाठी

Shivsenaate khandepalat! | शिवसेनेत खांदेपालट !

शिवसेनेत खांदेपालट !

Next

हालचाली सुरु : नव्या जिल्हाप्रमुखपदासाठी लॉबिंग
अमरावती : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अंतर्गत वादामुळेच शिवसेनेला हे वाईट दिवस आले आहेत. आता पुन्हा नव्या दमाने संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेत खांदेपालटाचे वारे वाहू लागले आहे. नव्याने जिल्हाप्रमुख, शहराध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी ‘मातोश्री’च्या पायऱ्या झिजवायला सुरूवात केली आहे.
शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंड, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर हे आहेत. तर महानगर प्रमुखपदी दिंगबर डहाके हे आहेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया झाल्या. अंतर्गत विरोधातून करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीचा फटका विधानसभा निवडणुकीत अभिजित अडसूळ, संजय बंड, नाना वानखडे यांना प्रामुख्याने बसला.
खासदारविरोधात एकवटले
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या शिवसेनेत जिल्ह्यात आजही एकमेकांना पदावरुन हटविण्याची मोहीम जोरात राबविली जात आहे. अध्यक्ष पद कसे मिळेल, यासाठी नेत्यांना गळ घातली जात आहे. जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष पदांवर असलेल्यांना बाजुला ठेवण्याची रणनिती तयार होत आहे. जानेवारीच्या अखेर शिवसेनेत फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. खा. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात असलेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पदावर नसलेले नेते एकवटले आहेत. विशेषत: शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या सत्कार सोहळ्याला खासदार अडसूळ विरुद्ध असलेल्या समर्थकांचा भरणा सर्वाधिक दिसून आला. ना. दिवाकर रावते यांचा दौरा शासकीय असला तरी या दौऱ्याने नाराज असलेल्या शिवसैनिकांना संजिवनी मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पदी कोणाची वर्णी लागेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी ना. रावतेंच्या दौऱ्याने अनेकांची नावे चर्चित आली आहेत. यात शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य सूधीर सुर्यवंशी, माजी खा. अनंत गुढे, सोमेश्वर पुसतकर व सिद्धेश्वर चव्हाण यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. अमरावती शहर प्रमुख पदासाठी नगरसेवक प्रवीण हरमकर, अमोल निस्ताणे, प्रकाश मंजलवार, सुनील खराटे, पंजाबराव तायवाडे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेत गटतट वाढल्याचा पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखपदी कोणाची वर्णी लागेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Shivsenaate khandepalat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.