धक्कादायक! अमरावती ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फाइल गहाळ
By गणेश वासनिक | Published: June 27, 2023 10:10 PM2023-06-27T22:10:26+5:302023-06-27T22:24:38+5:30
राज्य शासनाकडून चौकशी समिती गठीत झाली असून कोणी रेकॉर्ड गहाळ केले, हे लवकरच पुढे येणार आहे.
अमरावती : आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमधून ‘कास्ट व्हॅलिडीटी’च्या तब्बल ३५ फाइल (नस्ती) गहाळ झाल्या आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले आहे. राज्य शासनाकडून चौकशी समिती गठीत झाली असून कोणी रेकॉर्ड गहाळ केले, हे लवकरच पुढे येणार आहे.
अमरावती ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीच्या गलथान कारभाराला कंटाळून गहाळ झालेल्या ‘कास्ट व्हॅलिडीटी’ प्रकरणाचा शोध घेण्यासाठी प्रथमेश विक्रम बन्ने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्रमांक १४१/२०२२ अन्वये रिट याचिका दाखल करून न्याय मागितला. मात्र, या रिट याचिकेच्या सुनावणीदरम्यान रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.