धक्कादायक! डफरीनचे ‘मेडिकल वेस्ट ’ सुकळी कंपोस्ट डेपोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:09 PM2018-05-23T22:09:05+5:302018-05-23T22:09:05+5:30

स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील जैववैद्यकीय कचऱ्याची सुकळी कंपोस्ट डेपोत नियमबाह्य विल्हेवाट लावल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ग्लोबल इकोसेव्ह सिस्टीम या कंत्राटदाराने तब्बल चार महिने डफरीनमधील जैववैद्यकीय कचऱ्याची उचल न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची अप्रत्यक्ष कबुली वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

Shocking Dufferin's 'Medical West' dry compost dept | धक्कादायक! डफरीनचे ‘मेडिकल वेस्ट ’ सुकळी कंपोस्ट डेपोत

धक्कादायक! डफरीनचे ‘मेडिकल वेस्ट ’ सुकळी कंपोस्ट डेपोत

Next
ठळक मुद्देबेजबाबदारपणे विल्हेवाट : देयक थकल्याने प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील जैववैद्यकीय कचऱ्याची सुकळी कंपोस्ट डेपोत नियमबाह्य विल्हेवाट लावल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ग्लोबल इकोसेव्ह सिस्टीम या कंत्राटदाराने तब्बल चार महिने डफरीनमधील जैववैद्यकीय कचऱ्याची उचल न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची अप्रत्यक्ष कबुली वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे. शासकीय रुग्णालयात घातक जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात बेजबाबदारपणा होत असेल, तर जबाबदारी कुणाची, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
जुलै ते आॅक्टोबर २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीत ग्लोबल इकोसेव्ह सिस्टीम या कंत्राटदाराने डफरीनमधील मेडिकल वेस्ट उचलले नाही, अशी तक्रार तेथील मुकादमाने १५ जानेवारी २०१८ रोजी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. आरोग्य उपसंचालकांपर्यंत तक्रारी झाल्या.
डफरीनमध्ये दिवसाकाठी ३५ ते ४० महिलांची प्रसूती होते. २०० खाटांच्या या रुग्णालयातून रोज मोठ्या प्रमाणात घातक मेडिकल वेस्ट बाहेर पडते. प्रसूतीनंतर निघणाºया ‘प्लॅसेन्टा’चा यात अधिक समावेश आहे. हे मेडिकल वेस्ट अत्यंत घातक असून एकाच दिवसात त्याची प्रचंड दुर्गंधी सुटते. ग्लोबल इकोसेव्ह सिस्टीमने जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत डफरीनमधील मेडिकल वेस्टची उचल केली नसल्याची नोंद वैद्यकीय अधीक्षकांकडे आहे. या प्चार महिन्यांत घातक अशा जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट कशी लावली, या प्रश्नावर वैद्यकीय अधीक्षक अर्चना जामठे यांनी आपण नुक ताच पदभार घेतला असल्याचे सांगून अधिनस्थ कर्मचाºयाला बोलावून घेतले व त्यास विचारणा केली. त्यावेळी तो संपूर्ण घातक कचरा अतिशय दुर्गंधी सुटल्याने महापालिकेच्या कंटेनरमध्ये टाकला. महापालिकेच्या कंटेनरच्या माध्यमातून तो सुकळी कंपोस्टमध्ये पोहोचल्याची कबुली कर्मचाºयाने अधीक्षकांसमक्ष दिली. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे सानप नामक त्या कर्मचाºयाने सांगितले. मात्र, काही कालावधीनंतर कर्मचाºयाची माहिती ही बतावणी ठरवत केवळ सुका कचराच महापालिकेच्या कंटेनरमध्ये टाकण्यात आल्याची माहिती डॉ. जामठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विशेष म्हणजे, जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत वैद्यकीय अधीक्षक या पदावर कार्यरत नसताना, हे गंभीर प्रकरण निस्तरण्याचा डॉ. अर्चना जामठे यांनी प्रयत्न केला. मात्र, अधिनस्थ कर्मचारी खरे बोलून गेला. एकंदर मेडिकल वेस्टची बेजबाबदार पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले. डफरीनच्या गळ्यात दंड वा कारवाईचा घंटा कोण बांधणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
जैववैद्यकीय कचरा म्हणजे काय?
क्लिनिक, रुग्णालयात उपचार घेण्यास जाणाºया रुग्णांच्या शरीरावर झालेल्या जखमांची मलमपट्टी म्हणजेन ड्रेसिंग, त्यासाठी वापरलेले कापूस, मलम, रक्ताने माखलेला कापूस, वापरण्यात आलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज तसेच शस्त्रक्रियेतून बाहेर काढलेला शरीराची अनावश्यक भाग, मुदत संपलेली औषधे, उपचाराशी निगडीत संपर्कात आलेली प्रत्येक वस्तू यांचा जैववैद्यकीय कचºयात समावेश होतो. त्यातील किटाणूंमुळे फुफ्फुसाशी निगडीत जंतुसंसर्गाची जोखीम वाढते.

मी त्यावेळी कार्यरत नव्हते. मात्र, आकस्मिक परिस्थितीत जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी आमच्याकडे ‘डीप ब्युरियल पीट’ आहे. तो वापरात आहे. जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत घातक कचºयाची विल्हेवाट त्यात लावण्यात आली असावी. सुका कचरा महापालिकेच्या कंटेनरमध्ये टाकण्यात आला असावा.
- डॉ. अर्चना जामठे,
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय

Web Title: Shocking Dufferin's 'Medical West' dry compost dept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.