धक्कादायक! अमरावती जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:30 AM2020-05-11T11:30:08+5:302020-05-11T11:30:47+5:30

मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे.

Shocking! Molestation of a woman kept in quarantine in Amravati district | धक्कादायक! अमरावती जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा विनयभंग

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा विनयभंग

Next
ठळक मुद्देवडगाव राजदी येथील धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली असून, चांदूर रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला अटक केली. हा प्रकार तालुक्यातील वडगाव राजदी या गावात घडला.
रणजीत उर्फ प्रदीप हरिदास गजबे, असे या दारुड्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे.  धामणगाव तालुक्यातील वडगाव बाजदी येथे तो पोलीस पाटील असून, रिक्त असलेल्या वडगाव राजदी या गावाचा कार्यभार त्याच्याकडे होता. मागील सात दिवसांपूर्वी या गावातील मजूर जोडपे मुंबईहून आपल्या गावात परतले. ग्रामपंचायतीने येथील जिल्हा परिषद शाळेत या जोडप्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. शुक्रवारी जिल्ह्यात दारूची दुकाने उघडली. पोलीस पाटील त्याच दिवशी दारू पिऊन दुपारी गावात आला. जिल्हा परिषद शाळेत असलेल्या या जोडप्याजवळ जाऊन सदर महिलेला अश्लील भाषेत वर्तन करून हात पकडून सोबत चल, असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली व मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी दिली.  इतर उपस्थितांच्या समोर घडलेल्या या घटनेत महिलेने आरडाओरड करताच पोलीस पाटील घटनास्थळावरून पळून गेला.  ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. गावकऱ्यांनी शनिवारला रात्री चांदुर पोलिसांन पाचारण केले दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक शंकर ढोले व पो.का.पंकज शेंडे,विनोद वासेकर यांनी आरोपी पोलीस पाटलाला ताब्यात घेतले पोलीस पाटील यानेच हा घृणास्पद प्रकार केल्याने वडगाव राजदी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने चांदुर पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला होता. आरोपी रणजित उर्फ प्रदिप गजबे विरूध्द चांदूर रेल्वे पोलीसांनी भादंवी कलम ३५४ (अ), २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.चांदुर रेल्वे चे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Shocking! Molestation of a woman kept in quarantine in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.