धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात आईने १४ वर्षीय मुलीला विकून लावले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:54 AM2019-06-25T10:54:28+5:302019-06-25T11:02:50+5:30

पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला.

Shocking Mother sold her 14-year-old daughter in Amravati district | धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात आईने १४ वर्षीय मुलीला विकून लावले लग्न

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात आईने १४ वर्षीय मुलीला विकून लावले लग्न

Next
ठळक मुद्देवडिलांनी केली तक्रारप्रकरण पोहोचले ओलावा सहायता कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला. ओलावाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यानंतर सोमवारी पीडित मुलीला चाइल्ड लाइनमार्फत बालकल्याण समितीसमोर हजर करून तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
भातकुली तालुक्यातील रहिवासी १४ वर्षीय प्रणिता (काल्पनिक नाव) या मुलीचे आई-वडील सात वर्षांपूर्वी विभक्त झाले. तेव्हापासून तिची आई अकोला तर वडील भातकुली तालुक्यात राहते. तिला एक लहान बहीण आहे. प्रणिता ही आठवीत शिकते. १८ डिसेंबर २०१८ रोजी प्रणिताला आईने स्मार्ट फोन घेऊन दिला. त्यानंतर आई, आजी व मावसभाऊ प्रणिताशी मोबाईलवर संपर्क साधू लागले. १२ फेबु्रवारी २०१९ रोजी आईने प्रणिताला आजीची प्रकृती बिघडल्याचे फोनवर सांगून अकोल्यात बोलावले. ती शाळेतून बसने अकोल्यात पोहोचली. तीन दिवस ती आईसोबत राहिली. दरम्यान, आईने प्रणितासाठी विवाहाचे स्थळ पाहण्यास सुरुवात केली. तिला एक मुलगा दाखविला. त्यानंतर ११ एप्रिल रोजी आईने प्रणिताचे एका २९ वर्षीय तरुणाशी मंदिरात सांक्षगंध लावले. त्यांच्या विवाहाला गावकºयांनी विरोध केला. त्यानंतर आईने प्रणिताला तीन दिवस घरी ठेवले. सासूची प्रकृती खराब झाल्याचा बहाणाने आईने प्रणिताला त्या तरुणाच्या घरी पाठविले. तेथे प्रणिताने सासुला घरगुती कामात हातभार दिला. सांक्षगंध झालेला तरुण तिच्याशी जवळीक साधेल, अशी भीती प्रणिताच्या मनात होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यानंतर आईने प्रणिताला पुन्हा घरी आणले. दरम्यान, मुलगी घरी न परतल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. भातकुली पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील ओलावा महिला व बालकांकरिता असलेल्या सहायता कक्षाकडे दाद मागितली. ओलावा सहायता कक्षाच्या सल्लागार शालिनी काळे, समुपदेशक निकिता चव्हाण व सामाजिक कार्यकर्ता मृदुला पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य बघून मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न चालविले. ओलावा कक्षाकडून मुलीच्या आई व सांक्षगंध झालेल्या तरुणाला नोटीस बजावून १३ जून रोजी बोलावण्यात आले. त्यांनी उपस्थिती दर्शवून असे काही झाले नसल्याचे बयाण दिले. मात्र, ओलावा कक्षाच्या पदाधिकाºयांना आई व त्या तरुणाच्या बयाणावर संशय आला. त्यांनी मुलगी प्रणिताला घेऊन येण्यासंदर्भात तिच्या आईला सांगितले. १९ जून रोजी प्रणिता व तिची आई ओलावा कक्षात गेले. त्यावेळी प्रणिता आईसमोर काही बोलत नव्हती. तिला धक्का देऊन दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आईला बाहेर पाठवून तेथील पदाधिकाºयांनी प्रणिताची विचारपूस केली. त्यावेळी ती बोलली, आईने एका तरुणाशी सांक्षगंध लावल्याचे सांगितले. त्यानंतर तिने वडिलांसोबत राहायचे असल्याचे बयाण कोतवाली पोलिसांना दिले. ही बाब माहिती होताच प्रणिताच्या आईने ओलावा कक्षात प्रचंड गोंधळ घातला होता. प्रणिताला चाइल्ड लाइनमार्फत बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर प्रणिताला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

भातकुली पोलिसांची तक्रार घेण्यास नकार
मला वाचवा बाबा, मला विकले, असे मुलीने फोनवर सांगितल्याचे वडिलाने तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात वडील भातकुली पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता, तेथून त्यांना पोलिसांनी हाकलून लावले, कोर्टात जा, असा सल्ला दिल्याचे वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. पीडित मुलीला विक्री करून तिचे लग्न लावण्यात येत असल्याची गंभीर घटना असतानाही भातकुली पोलिसांनी तक्रार का नोंदविली नाही, ही बाब गंभीर आहे.

मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आदेशाने मुलीला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
- फाल्गून पालकर, चाइल्ड लाइन

Web Title: Shocking Mother sold her 14-year-old daughter in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.