धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:58 PM2020-07-13T17:58:19+5:302020-07-13T17:59:05+5:30

बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे.

Shocking! Promoted Kovid-19 marks given in Agricultural University | धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका

धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये नाराजी प्रथम, द्वितीय, तृतीय सेमिस्टर गुणपत्रिकेवर नोंद

गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ असे अंकित असलेल्या गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, कोरोना डाग लागल्याची खंतदेखील व्यक्त करण्यात येत आहे. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षाकरिता गुणपत्रिका देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने कृषी पदवी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, तर उर्वरित सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाईल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापेठ परभणी, तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांनी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित सत्राला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता बढती दिली आहे. यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकाह्णचे फार्मेटसुद्धा महाविद्यालयांना पाठविले आहे. मात्र, ही गुणपत्रिका बी.एस्सी. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात कायम शल्य ठरणार आहे.

हा तर शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हास
कृषी पदवी विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हास होय. यात अभ्यासू विद्यार्थ्यांची प्रचंड हानी झाली आहे. एकाच रांगेत सगळे विद्यार्थी गणल्या जात आहे. बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे. मूल्यांकन नसेल तर विद्यार्थी कसा घडेल, ऑफलाईन परीक्षा घेता येत नाही, किमान असायमेंट घ्यायला हवी, अशी खंत अकोला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत पजई यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

कृषी विद्यापीठाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. व्हायवा ऑनलाईन पार पडला आहे. महाविद्यालयातून सुमारे २४० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.
- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिक्लचर, अमरावती.

Web Title: Shocking! Promoted Kovid-19 marks given in Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.