यंदा नऊ केंद्रावर तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:11 PM2019-01-29T23:11:28+5:302019-01-29T23:12:17+5:30

यंदाच्या हंगामातील तुरीची ५,६७५ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात डीएमओकडून चार व व्हीसीएमएफद्वारे पाच केंद्रांवर ही खरेदी होईल.

Shop for nine centers this year | यंदा नऊ केंद्रावर तूर खरेदी

यंदा नऊ केंद्रावर तूर खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देहमीभावाने खरेदी, केंद्र निश्चिती : ६ फेब्रुवारीपर्यंत केंद्रांवर आॅनलाईन नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामातील तुरीची ५,६७५ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात डीएमओकडून चार व व्हीसीएमएफद्वारे पाच केंद्रांवर ही खरेदी होईल. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित केंद्रांवर ६ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी ते ७ मे या कालावधीत तुरीची नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी सांगितले.
डीएमओद्वारे तूर खरेदीसाटी १० केंद्रांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यापैकी चार केंद्रांना मंजुरात व आयडी क्रमांक आले आहेत. यामध्ये तिवसा, चांदूर रेल्वे, दर्यापूर व धारणी केंद्राचा समावेश आहे. मागील वर्षी सात केंद्रांवर नोंदणी व खरेदी करण्यात आली होती. व्हीसीएमएफद्वारे वरूड, मोर्शी, धामणगाव, चांदूरबाजार व अमरावती या केंद्रांवर खरेदी व नोंदणी होणार आहे. नाफेडच्या सूचनेनूसार शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करताना शेतकºयाचे आधार कार्ड, सात-बाराचा उतारा, पीकपेरा, बँकेचे पासबूक ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. कुठल्याही परिस्थितीत आॅफलाइन नोंदणी करता येणार नाही.
ज्या तालुक्यात शेतकºयाची शेतजमीन आहे, त्याच तालुक्यात नोंदणी करावी लागणार आहे. नाफेडने ठरवून दिलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे सबएजंटला तुरीची खरेदी करावी लागणार आहे तसेच शासनाद्वारे प्राप्त होणाºया हेक्टरी उत्पादनानुसार व सातबाºयावरील क्षेत्रमर्यादेत तुरीची खरेदी होणार आहे. यापेक्षा अधिकची खरेदी केल्यास आॅफलाइन खरेदी गृहीत धरून सबंधित सबएजंट संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावण्यात आले आहे. खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे आॅनलाइन पेमेंट करण्यात येणार असल्याचे नाफेडच्या सरव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.
‘एसएमएस’च्या सात दिवसात खरेदी
ज्या शेतकऱ्यांची ‘एनइएमएल’ या पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे, अशाच शेतकऱ्यांना एसएमएस देण्यात येणार आहे व त्यांचा सात दिवसांत माल खरेदी करण्यात येईल.
यंदाच्या हंगामातील नवीन तुरीचीच खरेदी करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत जुनी तूर खरेदी करण्यात येणार नाही तसेच तुरीची खरेदी करताना पूर्ण मालाची चाळणी करूनच स्वीकारण्यात येणार आहे.
खरेदी करण्याच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे तुरीमध्ये १२ टक्के ओलावा असल्यासच स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती व सबएजंट संस्थेकडून आर्द्रता मापन यंत्र उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे सचिवांना पत्र
यंदाच्या हंगामातील तूर खरेदी करताना तुरीचे आंतरपीक गृहीत धरले जात असल्याने ज्या शेतकºयांनी सलग पेरा केला, त्यांचे नुकसान होते. उत्पादकता जास्त असताना सबएजंट गृहीत धरीत नाही. त्यामुळे तुरीचे आंतरपीक गृहीत न धरता सलग पीक समजण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे होत आहे. गतवर्षीही हाच घोळ झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीचे पत्र पणन विभागाच्या सचिवांना दिले आहे. एक वा दोन दिवसांत उत्तर अपेक्षित असून, त्यानंतरच तुरीची आॅनलाइन नोंदणी सुरू होईल.

Web Title: Shop for nine centers this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.