रेशन धान्य देत नाही म्हणून बदलून टाकला दुकानदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:27+5:302021-07-11T04:10:27+5:30

शहर, ग्रामीण भागातील २५ हजार ५०२ जणांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ अमरावती : शासनाने दिलेल्या रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर ...

Shopkeeper replaced as ration does not give grain! | रेशन धान्य देत नाही म्हणून बदलून टाकला दुकानदार!

रेशन धान्य देत नाही म्हणून बदलून टाकला दुकानदार!

Next

शहर, ग्रामीण भागातील २५ हजार ५०२ जणांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

अमरावती : शासनाने दिलेल्या रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करीत स्वस्त धान्य दुकान बदलण्याचे स्वातंत्र्य ग्राहक घेत आहेत. गत वर्षापासून सुरू झालेल्या या योजनेस शहरासह ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीला आळा बसला असून, ग्राहकांना सेवाही चांगली मिळण्यास मदत होत आहे. पुरवठा विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, २५ हजार ५०२ जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे, याकरिता विशेष उपाययोजना करण्यात आल्या येत आहेत. त्यानुसार केंद्र व राज्य शासनानेही अन्न वितरण व्यवस्थेत बदल केले आहेत. यापूर्वी एकाच दुकानदाराकडे नोंद झाल्यानंतर तेथूनच धान्य घ्यावे लागत होते. अनेक जणांचे वास्तव्य अन्य गावात, तर रेशन कार्ड मूळ गावच्या पत्त्यावर असते. असे अनेक ग्राहक धान्य घेणे बंद करतात. शासनाच्या पोर्टेबिलिटीच्या या सुविधेमुळे कुठल्याही भागात धान्य मिळत असल्याने लाभार्थींची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागातून रोजीरोटीसाठी शहरात स्थलांतर केलेल्या कुटुंबांना या सुविधेचा लाभ होत आहे. कार्ड पोर्टेबिलिटीमुळे कुठेही धान्य घेता येत आहे. शहरात अनेकवेळा धान्य वितरण करतांना अव्यवस्था दिसून येते. त्या प्रकाराने त्रस्त ग्राहकही या योजनेचा लाभ घेत आहेत. अमरावती आणि अचलपूर या मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांना सुविधेचा चांगला लाभ मिळाला आहे.

बॉक्स

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना कालावधीमुळे उदरनिर्वाहाची सोय नसलेल्या लाभार्थींना राज्य शासनाने मोफत धान्य योजना सुरू ठेवली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही येत्या नोव्हेंबरपर्यंत पात्र लाभार्थींना मोफत धान्य मिळणार आहे. मोफत धान्य मिळणार असल्याने गोरगरीब व गरजू घटकांना दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक

१९४०५७८

किती जणांनी बदलला दुकानदार? -२५५०२

प्राधान्य गट - २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी - ८००२८

बॉक्स

कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार?

अचलपूर - ५४८८

अमरावती ग्रामीण - १२१४

मोर्शी - ७६७

अंजनगाव सुर्जी - ६५०

भातकुली - ४६४

चांदूर रेल्वे - ७३०

चांदूर बाजार - १३०९

चिखलदरा - १४६

दर्यापूर - ९८७

धामणगाव रेल्वे - ७१५

धारणी - ४६८

नांदगाव खंडेश्वर - ४८९

तिवसा - ४०५

वरूड - ७५७

अमरावती शहर - १०९१३

Web Title: Shopkeeper replaced as ration does not give grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.