बडनेऱ्यात दुकाने बंद, रस्त्यावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:37+5:302021-04-19T04:12:37+5:30
नागरिकांची संख्या मोठीबडनेरा : शासन, प्रशासनाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली. मात्र, बडनेरा शहरात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या ...
नागरिकांची संख्या मोठीबडनेरा : शासन, प्रशासनाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली. मात्र, बडनेरा शहरात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही बहुतांश विनाल्स्क दिसून येत आहेत. नियम तोडणाऱ्यांना कडक शासन करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
कोरोना संसर्गाने सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. बडनेरा शहरात हातगाडीवर विक्री करणारे बहुतांश नागरिक मास्क लावत नाहीत. त्याचप्रमाणे रस्त्यांवरून फिरणारे बरेच लोक मास्कविनाच भटकंती करीत असल्याचे शहरातील चित्र आहे.
बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी शहरात पेट्रोलिंग दरम्यान दुकानदार तसेच रस्त्यावरून फिरणाऱ्यांना कडक कारवाई करू, अशी तंबी दिली. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत शहरातील दुकाने बंद होत असली तरी रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे.
गतवर्षी बडनेरा शहर कोरोनाचा हॉट स्पॉट बनला होता. यंदा आतापर्यंत स्थिती नियंत्रणात असला तरी नियम न पाळल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, हे नाकारता येणार नाही.