थोडक्यातील बातम्या पान चार करीता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:23+5:302021-06-18T04:10:23+5:30
अमरावती : धारणी येथील शेतकरी सरस्वती मोहनलाल बारवान यांच्या मालकीच्या वहितीच्या शेतात शासकीय जमीन समजून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने सफाई ...
अमरावती : धारणी येथील शेतकरी सरस्वती मोहनलाल बारवान यांच्या मालकीच्या वहितीच्या शेतात शासकीय जमीन समजून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने सफाई कंत्राटदाराने घनकचरा टाकला आहे. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मानवी हक्क अभियानचे नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे.
............................
अन्यायकारक शासननिर्णयाचे दहन
अमरावती : आदिवासी विकास विभागाने ७ जून रोजी जारी केलेला अन्यायकारक शासननिर्णयाच्या निषेधार्थ आदिवासी कोळी महासंघ, आदिवासी संघर्ष समितीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. यावेळी सदर शासननिर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
...............................................................
जलव्यवस्थापन समितीची सभा
अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा १८ जून रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित केली आहे. यावेळी पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
....................................
कृषी विषय समितीची सभा
अमरावती ; जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा विविध विषयांना अनुसरून १८ जून रोजी उपाध्यक्ष तथा सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
..........................................
उद्यानात रेलचेल वाढली
अमरावती : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आतापर्यंत शहरातील अनेक उद्याने बंद होती. आता मात्र कोरोना संसर्ग कमी होत असल्याने आता निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्यानांमध्ये रेलचेल वाढली आहे.