थोडक्यात वाचले ३१ प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:16 PM2019-07-01T23:16:45+5:302019-07-01T23:17:18+5:30
रस्त्यावर धावणारी बस अचानक घाटवळणाच्या चढावर बंद पडली. ती मागे येऊन दरीत कोसळेल, असे क्षणभर वाटले. प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, चालकाने अनुभव पणाला लावून बस थांबविली आणि तातडीने प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यांच्या समयसूचकतेने ३१ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.
चिखलदरा : रस्त्यावर धावणारी बस अचानक घाटवळणाच्या चढावर बंद पडली. ती मागे येऊन दरीत कोसळेल, असे क्षणभर वाटले. प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, चालकाने अनुभव पणाला लावून बस थांबविली आणि तातडीने प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यांच्या समयसूचकतेने ३१ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.
हृदयाचा थरकाप उडविणारा ही घटना रविवारी दुपारी ३ वाजता मोथा गावानजीकच्या सेल्फी पॉइंट वळणावर घडली. एमएच ४० एन ८९३० या क्रमांकाची बस प्रवाशांना घेऊन चिखलदराला जात असताना सेल्फी पॉइंटखालील वळणावर अचानक नादुरुस्त होऊन थांबली. उंच भागावर थांबलेली ही बस मागे येऊ लागल्याने त्यामधील प्रवाशांनी एकच गलका केला. तथापि, चालकाने समयसूचकता दाखवून बस थांबविली. क्षणाचा विलंब न करता प्रवासी बस खाली उतरले. या बसमध्ये जवळपास ३१ प्रवासी होते. रस्त्यावर थांबलेल्या या बसमुळे वाहतुकीला खोळंबा झाला. काही पर्यटकांनी या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. यासंदर्भात परतवाडा आगाराचे प्रमुख अनिकेत बल्लाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
फौजदारीची मागणी
परतवाडा आगारातील ७० बसच्या बहुतांश फेºया धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये चालविण्यात येत असल्याचे परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे. या बसफेºया अनियमित आहेत. नादुरुस्त बस मेळघाटात पाठवणाºया अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आगाराची हेकेखोरी
परतवाडा आगारातून मेळघाटात नादुरुस्त व भंगार बसगाड्या पाठविल्या जातात. घाटवळणावर बस नादुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही परतवाडा आगाराला जाग आलेली नाही.