अल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 05:00 AM2021-09-16T05:00:00+5:302021-09-16T05:00:26+5:30

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात.

Short-term soybean crop benefits farmers | अल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याचे

अल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याचे

googlenewsNext

इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीनचे वाण अल्प कालावधीचे तयार झाले असून ते पावसाच्या दिवसात येत असल्याने शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे. अल्प वाणाच्या पिकाची सप्टेंबर महिन्यात सवंगणी होत असल्याने शेत रिकामे होऊन रबी हंगामासाठी तयार करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी हे वाण फायद्याचे ठरू शकते.विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात. पावसाचे दिवस कमी असले तरीही या पिकांचा कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना मालामाल करू शकते. मात्र, विदर्भात मध्यम वाणाचे पीक सातत्याने घेतले जातात, असे कृषितज्ज्ञ म्हणाले.

जमिनीचा पोत, सिंचन सुविधा आणि पीक पद्धतीवर वाणाची निवड अवलंबून असते. ऑफ सिझनमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्यास ग्रीन मोझॅकचा प्रादुर्भाव वाढतो.
- डॉ. सतीश निचळ, शास्त्रज्ञ, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र

शेतकरी म्हणतात....

यंदा अर्ली व्हेरायटी सोयाबीनच्या पाच बॅग पेरणी केली. शेंगाही बऱ्यापैकी आहेत. मात्र, सध्या सततचा पाऊस पिकासाठी धोकादायक ठरण्याची भीती वाटू लागली आहे. १५ दिवसांची उसंत मिळाल्यास बऱ्यापैकी उत्पादन होण्याची आशा आहे.
- बलदेव चव्हाण,
शेतकरी, मांजरी म्हसला

यंदा अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन पेरले. पिकाची स्थितीसुद्धा उत्तम होती. मात्र, ऐन फुलोरावर असताना पाऊस राहिल्याने अळ्याचा मारा होऊन पूर्ण फुले फस्त केल्याने शेंगाच धरल्या नाही. यंदा सवंगणीचीही संधी मिळणार नसल्याने मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
- गोपाल सगणे, शेतकरी, सावळापूर
 

झटपट येणारे सोयाबीन
जे एस - २००३४, जे एस ९५-६०जेएस-९३-०५, पीडीकेयू अंबा, एनआरसी १४२, एनआरसी १३८
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन
सुवाना सोया, पीडीकेयू येलो, गोल्ड, एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एनआरसी - ८६
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन
एमएयूएस-११८८, फुले संगम, फुले किमया, एनआरसी-३७, जेएस-९७-५२ हे वाण उशिरा येणारे आहेत.

 

 

Web Title: Short-term soybean crop benefits farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती