महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:37+5:302021-06-04T04:11:37+5:30
फोटो पी ०३ नांदगाव पान २ चे लिड मोजक्या बॅग उपलब्ध, ग्राहक अधिक, सकाळी ६ वाजतापासून शेतकरी रांगेत ...
फोटो पी ०३ नांदगाव
पान २ चे लिड
मोजक्या बॅग उपलब्ध, ग्राहक अधिक, सकाळी ६ वाजतापासून शेतकरी रांगेत
नांदगाव खंडेश्वर : महाबीज सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत असून, बॅग कमी व ग्राहक अधिक असे चित्र आहे. सकाळपासूनच कृषिकेंद्रासमोर महाबीज सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्याच्या रांगा लागलेल्या असतात. इतर सोयाबीन बियाण्याच्या कंपन्याच्या भावाच्या तुलनेत महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर हजार ते बाराशे रुपये प्रतिबॅगवर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे अधिक दिसून आला.
महाबीज कंपनीकडून कृषी केंद्रधारकांना बियाण्यांचा पुरवठा कमी झाल्याने जागा कमी व ग्राहक जास्त अशी स्थिती झाली आहे. कृषी केंद्रावर महाबीज सोयाबीन बियाण्यांच्या बॅग उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकरी सकाळी ६ वाजतापासून कृषी केंद्रासमोर बियाणे मिळवण्यासाठी रांगेत उभे राहतात. काही तासातच त्या बियाण्याचा साठा संपल्याने कित्येकांना हात हलवत परत जावे लागते. महाबीज सोयाबीनची प्रतिबॅग २२५० रुपये असून इतर कंपनीचे बियाणे ३००० ते ३६०० रुपये प्रतिबॅग इतकी तफावत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आला शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे कमी दरात उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोट
कुटुंबात २५ एकर शेती आहे. त्यात पेरणीसाठी २५ बॅगा सोयाबीन लागतात. महाबीज बियाणे मिळाले नाही. त्यामुळे ३२०० प्रतिबॅग दराने इतर कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करावे लागले.
- किशोर गुलालकरी,
शेतकरी, पापळ
कॅप्शन : महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळवण्यासाठी कृषी केंद्रासमोर लागलेली रांग